Pearl millet Agrowon
ॲग्रो विशेष

Bajara : बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर का आहे?

थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे. सर्व तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारी बाजरी थंडीच्या दिवसांत आहारात असावी

Team Agrowon

अलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ज्वारी (Jowar), बाजरी (Bajara), नाचणी (Ragi) यांसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने व एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाची आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे. सर्व तृणधान्यात (Millets) जास्तीत जास्त ऊर्जा देणारी बाजरी थंडीच्या दिवसांत आहारात असावी. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्याने लहान मुले व गर्भवती महिलांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. गहू आणि मैद्याचा वापर असलेल्या बेकरी पदार्थांचा लहान मुलांच्या आहारात अधिक समावेश होत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यांसारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, ग्लुटेनची ॲलर्जी उद्‍भवणे अशा समस्याही दिसत आहेत. त्या टाळण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश करणे हिताचे ठरते.  

बाजरीचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये सोबत केल्यास वैशिष्ट्यपूर्ण व उत्तम चव मिळू शकते. घरगुती स्तरावर लघुउद्योग करता येईल. बाजरीच्या पोषण मूल्यांचा फायदा आरोग्य सुधारण्यास होईल

बाजरीचे आरोग्यदायी फायदे 

बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते.

अधिक ऊर्जा देत असल्याने शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी ही अधिक फायदेशीर ठरते.

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. परिणामी, हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशियम आणि पोटॅशिअमचा चांगला स्रोत असून, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बाजरीची भाकरी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते. परिणामी, वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.

पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन व ‘अ’ जीवनसत्त्व अधिक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT