Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : राज्यात कुठे पडणार विजांसह पाऊस?

राज्याच्या काही भागांमध्ये विजांसह पाऊस पडत आहे. मात्र पावसाचा जोर कमीच आहे. तसचं कोकणात पावसाची उघडीप कायम आहे.

Team Agrowon

पुणेः राज्याच्या काही भागांमध्ये विजांसह पाऊस (Rain) पडत आहे. मात्र पावसाचा जोर कमीच आहे. तसचं कोकणात पावसाची उघडीप कायम आहे. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली.

कोकणात बुधवारीही पावसाची उघडीप कायम होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र सर्वदूर पाऊस नव्हता. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, नगर, सोलापूर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील सटाना, दींडोरी, सिन्नर, हर्सूल, चांदवड, येवला, कळवण आणि सुरगणा या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील पारनेर तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे हलक्या सरी पडल्या. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. तसचं धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस झाला.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील अंबड, मंठा आणि घनसावंगी या मंडळांमध्ये पाऊस झाला. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे तर औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला.

विदर्भातही काही मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी, हिंगणा आणि सावनेर या मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, एटापल्ली, धानोरा, आरमोरी आणि कुरखेडा या मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही काठी ठिकाणी पाऊस पडला. मात्र पावसाचा जोर कमी होता.

माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरु केला. मात्र पोषक वातावरण नसल्यानं वायव्य भारतातच आहे. माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पोषक हवामानाची निर्मिती होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया आणि भंडारा तर संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT