Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics: अशी कुठे लोकशाही असते का? : जयंत पाटील

Jayant Patil: ‘‘विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अंदाधुंद मते वाढली, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही का लावले हे निवडणूक आयोग बघत नाही अन् दुसऱ्यांनाही दाखवत नाही, अशी कुठे लोकशाही असते का,’’ असा प्रश्न उपस्थित केला.

मुकूंद पिंगळे

Nashik News: ‘‘विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अंदाधुंद मते वाढली, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही का लावले हे निवडणूक आयोग बघत नाही अन् दुसऱ्यांनाही दाखवत नाही, अशी कुठे लोकशाही असते का,’’ असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीतील निकालावर बोट ठेवले.

आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम व वृक्षलागवड मोहिमेसाठी आलेले जयंत पाटील यांनी रविवारी (ता.२२) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालानंतर दीड महिन्याच्या आत न्यायालयात आव्हान न दिल्यास निवडणूक प्रक्रियेत वापरलेले सीसीटीव्ही कॅमेरे, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर पारदर्शकतेने निर्णय होणे गरजेचे होते. मात्र,निवडणूक आयोगाकडून त्यांना प्रतिसाद दिला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यात लक्ष घालतील. त्यांच्या मातोश्रीने इच्छा व्यक्ती केली आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यामुळे न्याय मिळेल, असे श्री. पाटील या वेळी बोलताना म्हणाले.

‘हिंदीची सक्ती नकोच’

‘‘एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी सक्तीची कधी होईल, यासाठी प्रयत्न करायचे. हिंदी पर्याय असेल तर हरकत नाही. मात्र, सक्तीचा विषय नको. हिंदीचे कौतुक मराठीपेक्षा जास्त करू नये, एवढी अपेक्षा असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडी एकत्र लढणार’

स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का, यावर जयंत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याला प्राधान्य असणार आहे. आम्ही एकसंघ लढू आणि चांगला निकाल दाखवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT