ॲग्रो विशेष

Farmer Exploitation : शेतकऱ्यांची अडवणूक कधी थांबणार?

टीम ॲग्रोवन

आनंद शितोळे

कोरोनानंतरची (Covi 19) ( म्हणजे कोरोना गेलाय अस सगळे म्हणताहेत म्हणून ) दिवाळी आणि सगळेच सण (Diwali Festival) दणक्यात साजरे करावे अस मायबाप सरकार म्हणतय. कपडे, वाहने, इलेक्ट्रोनिक साधने यांच्या दुकानात गर्दी आहे , पाय ठेवायला जागा नाही आणि पेपरात जाहिराती मावत नाहीयेत.

हे सगळ पाहून सगळ आलबेल असल्याचा भास होणाऱ्या किंवा तशी समजूत करून घेणाऱ्या लोकांसाठी, बाजारातली गर्दी फक्त सूज आहे.

सरकारी, निमसरकारी नोकरदार वर्ग, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे, आयटी मधले कर्मचारी आणि उच्च मध्यमवर्गीय ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे एवढ्याच लोकांची दिवाळी साजरी होतेय. बाकी लघुउद्योजक, जॉबवर्क करणारे वर्कशॉप, कंत्राटी कामगार, यांची अवस्था वाईट आहे.

त्यापेक्षा गंभीर अवस्था आहे शेतकरी वर्गाची. शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला गुंतवणूक चुकत नाही, त्यासाठी कर्ज चुकत नाही आणि पावसाने, दुष्काळाने सगळी माती केली तरी कर्जाचा बोजा चुकत नाही.

पीकविमा असो कि सरकारी नुकसानभरपाई असो, शेतकऱ्याला पैसे नाकारायचे कसे एवढच उद्दिष्ट समोर ठेऊन काम करायचं म्हटल कि तिथेही अडवणूक फक्त. या परतीच्या पावसाने सगळा नास केलाय, हाताशी आलेला घास मातीत गेलाय, नुकसान पैशात मोजून चालणार नाही, नुकसान संपूर्ण सिझनच झालेलं आहे , एक सिझन हुकला की घर दोन वर्षे रिव्हर्स जातंय.

निवडणुका, आघाडी बिघाडी , युती वगैरे खेळून झाल असेल आणि शहरातल्या तुंबलेल्या पाण्याचे व्हिडियो पाहून झाले असतील तर सरकारी यंत्रणा इकड कधी लक्ष देणार हा प्रश्न.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT