Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Compensation : गारपिटीच्या नुकसानीची मदत मिळणार कधी?

Crop Damage Compensation : खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला. पण मागील जानेवारी ते मार्च या कालावधील झालेल्या नुकसानीबाबतची मदत किंवा मदतनिधी अद्याप मिळालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला. पण मागील जानेवारी ते मार्च या कालावधील झालेल्या नुकसानीबाबतची मदत किंवा मदतनिधी अद्याप मिळालेला नाही. वादळ व गारपिटीत पीक व अन्य नुकसानीसंबंधीचे पंचनामे झाले आहेत. अहवालही तयार झाले.

त्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना झाला आहे. भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खानदेशात जानेवारीतही वादळ व गारपीट, पाऊस झाला. पुढे २६ व २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी वादळ व गारपीट झाली. जळगाव जिल्ह्यात २६ व २७ रोजीच्या वादळात १८ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती.

यानंतर १ मार्च रोजीच्या वादळी पाऊस व गारपिटीत सुमारे एक हजार हेक्टरला फटका बसला. तसेच २९ फेब्रवारी ते १ मार्च या दरम्यान धुळे व नंदुरबारातही गारपीट, वादळी पाऊस झाला. यात धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री भागात मोठी हानी झाली. नंदुरबारमध्येही नुकसान झाले होते.

शिरपुरातील कुवे, अर्थे, निमझरी भागात केळी, पपई, मका, गहू, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत खानदेशात विविध भागात गारपीट, पाऊस झाला. यामुळे हाताशी आलेला घास हिरावला गेला होता. कलिंगड, केळी, पपई या शेतीमालेचे दरही खरेदीदारांनी कमी केल्याने वित्तीय नुकसान अनेकांनी त्या वेळी सहन केले.

केळीची विक्रीही कमी दरात करावी लागली होती. केळीचे दर १८०० रुपयांपर्यंत होते. कलिंगडाचे दर २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान १३ ते १४ रुपये प्रतिकिलो, असे थेट शिवार खरेदीत दिले जात होते. परंतु कलिंगडाचे दरही १० ते ११ रुपये प्रतिकिलो झाले होते. पपई विक्रीतही त्या वेळी अनेकांना फटका सहन करावा लागला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT