Harvester Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting: गव्हाच्या मळणीला वेग: हार्वेस्टर यंत्रे दाखल!

Harvester Machine: रब्बी हंगामातील गव्हाचे पीक काढणीस सज्ज झाल्याने पुणे विभागात हार्वेस्टर यंत्रांची मागणी वाढली आहे. मजुरांची टंचाई आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता, शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने कमी वेळेत आणि कष्टात मळणी करण्यास प्राधान्य देत आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: रब्बी हंगामातील गव्हाची पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. पुणे विभागातील अनेक तालुक्यात शेतकरी गहू काढणीच्या कामात व्यस्त असून त्यांना मजुरांची समस्या भासत आहे. त्यामुळे वाढीव मजुरी देऊन गव्हाची काढणी शेतकरी करत आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या गव्हाची मशीनच्या साहाय्याने मळणी व काढणीची कामे सुरू झाले असून प्रति एकर चार ते साडेचार हजार रुपये दर आकारला जात आहे.

रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळाले. सध्या पिके काढणीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी काढणीला चांगलाच वेग आला आहे.

विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ६२ हजार ८९९ म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली असून पिके जोमात आली आहेत. त्यातच गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र दिवाळीनंतर अवकाळी झालेल्या पावसामुळे पोषक वातावरण तयार न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या होत्या.

सध्या गव्हाचे पीक पक्व झालेले आहे. हार्वेस्टरने गहू तयार करण्यास एकरी चार ते साडे चार हजार रुपये घेतात. मजुरांकडून गहू सोंगणी, पेंढ्या बांधणे, गहू मळणी यंत्राने तयार करून देण्यासाठी एकरी दोन पोते गहू घेतात. मळणी यंत्राचा खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागतो. महिला मजूर २५० ते ३०० रुपये, तर पुरुषांना ४०० रुपये रोजंदारी चालू आहे. गहू तयार करताना गव्हाचे भुस पाहिजे असल्यास असे हार्वेस्टर एकरी सहा हजार रुपये घेतात. शेतकऱ्यांना भुस नको असेल तर इतर शेतकरी भूस घेऊन जातात व हार्वेस्टरचा खर्चही ते देतात. या भुसाचा वापर जनावरांना चारा म्हणून होतो. एकरी सरासरी उत्पादन १५ ते १८ पोते मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.

पुणे जिल्ह्यात गहू पिकाची मळणी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. दरवर्षी या परिसरात फेब्रुवारी महिन्यात पंजाब, हरियाना या परराज्यांतील हॉर्वेस्टर यंत्रे गव्हाच्या मळणीसाठी दाखल होत असतात. हॉर्वेस्टर यंत्रांमुळे कमी वेळात, कमी कष्टात गव्हाची मळणी होते. तसेच मजुरांची टंचाई त्यामुळे हॉर्वेस्टर यंत्राद्वारे गहू मळणीला शेतकऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते. गव्हाच्या मळणीसाठी हॉर्वेस्टरवाले एकरी साडे चार हजार रुपयांपर्यंत दर घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT