Digital Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

WhatApp Agriculture Channel : शेतकऱ्यांसाठी ‘व्हॉट्सॲप संवाद’; कृषी विभागाचा डिजिटल उपक्रम

Digital Agriculture : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची प्रभावी माहिती पुरविण्यासाठी कृषी विभागाने आता ‘व्हॉट्‍सअॅप संवाद’ उपक्रम सुरू केला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची प्रभावी माहिती पुरविण्यासाठी कृषी विभागाने आता ‘व्हॉट्‍सअॅप संवाद’ उपक्रम सुरू केला आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या पुढाकाराने सध्या संपर्कासाठी प्रभावी असलेल्या व्हॉट्‍सअॅप वर नवीन चॅनेल सुरू केले आहे. त्याचे अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांच्या हस्ते कृषी विभागाच्या संवाद चॅनेलचा प्रारंभ झाला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सुधीर शिंदे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले, ‘कृषी विभाग, अहिल्यानगर’ या व्हॉट्सॲप चॅनेलच्या माध्यमातून कृषिविषयक योजनांची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, उन्नत बियाणे, पाणी व्यवस्थापन, अधिक उत्पादनासाठी स्मार्ट तंत्र, केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांद्वारे मिळणारे आर्थिक साह्य, कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीतील मूल्यवर्धनाच्या संधी, शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी मार्गदर्शन यासारखे फायदे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना करून दिले जाणार आहे.

जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या प्रमुख पिकावरती प्रक्रिया उद्योग उभारणी करणे, शेतमाल बाजारभाव मिळविण्यासाठी हा संवाद उपक्रम प्रभावी ठरेल. अधिकाधिक शेतकरी या उपक्रमात जोडण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्याद्वारे लिंक, क्यूआर कोड स्वरूपात प्रचार प्रसिद्धी करत तहसील व गटविकास अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणी चॅनेलच्या क्यूआर कोड लावला जाईल. याशिवाय गाव पातळीवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

‘कृषी विभाग, अहिल्यानगर’ व्हॉट्सॲप संवादातून शेतकऱ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. समृद्ध शेतीकडे वाटचाल करताना सोशल मीडियाचा हा मंच प्रभावी मंच ठरेल याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यात जोडले जाणार आहे. व्हॉट्‍सअॅप चॅनेलमधून शेतकरीही एकमेकांशी संपर्कात असतील.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT