Heavy Rain in Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain in Maharashtra : अरबी समुद्रात 'वेस्टर्न डिस्टर्बन्स', महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Western Disturbance : जेव्हा भारतातील हवामान बदलते, तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन अन् लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होते.

sandeep Shirguppe

Rain in Maharashtra : आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकासह अन्य पिकांना धोका पोहोचण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दमट हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान होत असलेल्या पावसाने आंबा, काजूसह अन्य पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दरम्यान पुणे जिल्हातील बहुतांश भागात काल (ता.१०) पासून अचानक संततधार पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार (ता. ८) मध्यरात्रीसून मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी (ता. ९) सकाळीही रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापुरात हलका पाऊस झाला दोन तासांहून अधिक काळ पडलेल्या पावसाने आंबा बगायतदारांचे नुकसान झाले आहे.

हलक्या पावसाची शक्यता

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी झाली असतानाच अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

निर्मिती कशी होते ?

जेव्हा भारतातील हवामान बदलते, तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन अन् लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेबरोबर हवा गतीने फिरते. वाऱ्याची दिशा असेल त्या दिशेला हा 'डिस्टर्बन्स' तयार होतो. या डिस्टर्बन्सची दिशा लक्षात घेऊन भारतीय हवामान खाते 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'चा अंदाज वर्तवते. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांतली आर्द्रता, त्यामुळे निर्माण होणाऱ्या दाबामुळे काही ठिकाणी पाऊस पडतो. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे तयार होणाऱ्या पावसाला 'बिगर मोसमी' पाऊस असेही म्हणतात. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुसळधार पाऊस पडतो.

रब्बीला पोषक

रब्बी हंगामातील गहू, वाटाणा, हरभरा, भुईमूग, हिवाळी पालेभाज्या, हिवाळी फळांसाठी 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' महत्त्वाचा असतो; कारण अचानक पाऊस पडल्याने शेतीला पाणी मिळते. हिवाळ्याच्या काळात सरासरी चार ते पाच वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होतातच.

  • बंगालच्या उपसागरावरील GG बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तसेच अरबी समुद्रामधील कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झालेला आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट तर संपूर्ण दक्षिण भारतात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात काही जिल्ह्यांत रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. - डॉ. युवराज मोटे, पर्यावरण अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

khandesh Water Projet : चाळीसगावातील मन्याड प्रकल्प अल्पावधीत ७५ टक्के भरला

Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे

Agrowon Podcast: हरभऱ्याचे दर कायम, कापूस दबावात, कांद्याची आवक स्थिर, मोहरीला मागणी तर जिऱ्याचे भाव टिकून

Irrigation Project Khandesh : पाडळसे, बुराईसह अनेक सिंचन प्रकल्पांचे भिजत घोंगडे

India Vice President Election: इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT