Vidarbha Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain News : पश्चिम विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षाच

Today Monsoon Update : राज्याच्या विविध भागांत मॉन्सून सक्रिय झाला. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत अनेक भागात मात्र, अद्यापही पाऊस झालेला नसल्याने पेरण्या रखडलेल्याच आहेत.

Team Agrowon

Akola Rain Update : राज्याच्या विविध भागांत मॉन्सून सक्रिय झाला. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत अनेक भागात मात्र, अद्यापही पाऊस झालेला नसल्याने पेरण्या रखडलेल्याच आहेत. वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे.

मागील दोन दिवसांत राज्यात विविध भागांत पावसाने दमदार हजेरी दिली. या भागात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस मात्र झालेला नाही. जूनचा शेवटचा आठवडा उघडला तरी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही.

यंदाच्या हंगामात अकोला जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम पेरणी झाली आहे. पाऊस नसल्याने कोरडवाहू पट्ट्यात पेरणीला सुरुवातही होऊ शकलेली नाही. प्रामुख्याने प्री-मॉन्सून कपाशीची लागवड तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी आदी तालुक्यांत झालेली आहे. कृषी विभागाच्या नोंदीनुसार हे क्षेत्र ५५० हेक्टरपर्यंत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कपाशीची लागवड सुमारे १४५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झालेली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ही लागवड केली.

यात प्रामुख्याने मोताळा तालुक्यात ४६७४ हेक्टर, खामगाव ३२४०, मलकापूर २५४०, नांदुरा १४३८, संग्रामपूर २७५, बुलडाणा २७२, देऊळगावराजा १०९, जळगाव जामोद १११८, सिंदखेडराजा ३७५ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. उर्वरित इतर पिकांची मात्र पाऊस नसल्याने पेरणी रखडलेली आहे.

वाशीम जिल्ह्यात खरिपाचे चार लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात ७५ टक्के क्षेत्र म्हणजेच सर्वाधिक तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. याही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पेरणीलायक पाऊस झालेला नाही.

प्री-मॉन्सून कपाशीची जगवण्याची धडपड

अकोला जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी तेल्हारा, अकोट तालुक्यांत शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड केली. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे कपाशीची रोपे जागेवर करपली.

वाणी किडीचा प्रादुर्भावही वाढला होता. हे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. रात्रभर जागून पिकाला पाणी दिले. आता कपाशीच्या पिकाला पावसाची मोठी प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT