Animal Market Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Market : सोलापुरात जनावरांचे आठवडे बाजार भरविण्यास सशर्त परवानगी

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते.

Team Agrowon

Solapur News : लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावामुळे (lumpy skin disease) सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडे बाजारावर घातलेली बंदी ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव सध्या कमी झाल्याने उठवण्यात आली आहे.

त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यात जनावरांचे आठवडे बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी सशर्त परवानगी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते. जनावरांच्या आठवडे बाजार बंदीसह जनावरांच्या वाहतुकीवरही निर्बंध घातले होते. त्यातही गाईंच्या वाहतुकीवर ते सर्वाधिक घालण्यात आले होते.

जिल्ह्यातील वाढत्या लम्पी स्कीनमुळे आठवडी बाजार भरवण्यासह प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोवंशीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

मात्र सध्या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. गोवंशीय पशुधनाच्या केवळ ०.११ टक्का एवढी लम्पी स्कीनची लागण असून, दैनंदिन मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे.

तसेच आजारी जनावरे औषधोपचाराला प्रतिसाद देत असून, रिकव्हरी रेटही वाढलेला आहे. त्यामुळे पुन्हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

...अशी असेल सशर्त परवानगी

१) जनावरांना प्रतिबंधक लस किमान २८ दिवसांपूर्वी दिलेली असावी.

२) बाजारात येणाऱ्या जनावरांचे लाळ्या खुरकूत लसीकरण झालेले असावे.

३) वाहतूक करताना जनावरांच्या आरोग्याचा दाखला बाळगावा.

४) बाजार परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आलेला असावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhandardara Dam : भंडारदरा, निळवंडेतून आवकेनुसार पाणी विसर्ग

Satpuda Rainfall : यावल तालुक्यातील हरिपुरा, वड्री प्रकल्प तुडुंब

New Post Offices : माढा लोकसभा मतदारसंघात तेरा ठिकाणी पोस्ट कार्यालयांना मंजुरी

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’ची कृषी विभागाकडून पाहणी

Shaktipeeth Highway : सांगोल्यात ‘शक्तिपीठ’चे मोजणीदार पाठविले माघारी

SCROLL FOR NEXT