Watershed Management Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Development : पाणलोट यात्रा’ आता ग्रामस्थांच्या दारात

Water Conservation : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. याद्वारे २२ हजार २० हेक्टर क्षेत्र पाणलोट उपायांखाली येणार आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व लोकशिक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ग्रामस्थांच्या दारापर्यंत ‘पाणलोट यात्रा’ लवकरच नेण्यात येणार आहे.

केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पासाठी सामाईक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात, तसेच उपजीविका उपक्रम, उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थींना लाभ देण्यात येतो.

या योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करुन जनजागृती करण्यासाठी, तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत पाणलोट यात्रा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण ७ प्रकल्प आहेत. योजनेचे सदस्य सचिव जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत.

खुलताबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, शिऊर हे प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कृषी विभाग आहे. हा कार्यक्रम ६५ गावांमध्ये सुरू असून या अंतर्गत ४३ हजार ९३५ हेक्टर हे भौगोलिक क्षेत्र, तर २२ हजार २० हेक्टर इतके उपचार क्षेत्र आहे. पाणलोट यात्रेसाठी जिल्ह्यामध्ये १४ गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी दिली.

उपक्रमात असेल...

  नागरिकांना मोबाइल थिएटर व्हॅनद्वारे पाणलोट कामांबाबत आभासी सहलींचा अनुभव देणे.

  पाणलोट चळवळीसाठी हातात माती घेऊन मृद व जलसंरक्षण आणि संधारणाची शपथ घेणे.

  योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये नवीन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे.

  पाणलोट कामांवर श्रमदान करणे, फळबाग लागवड करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP Maharashtra: ‘एफआरपी’पोटी बॅंकेची ‘हमी’

Cotton Picking Machine: कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र

Seed Fraud Case: बियाण्यांत फसवणूक झाल्याने शेतकरी कृषी अधीक्षक कार्यालयात

Soybean Price: नांदेड बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण सुरूच

Farm Loan Waiver: कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात शक्य

SCROLL FOR NEXT