Watermelon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड थांबली

Heat Impact on Crop: खानदेशातील शेतकऱ्यांनी रमजानच्या बाजारपेठेच्या आशेवर मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड केली होती. मात्र, कमी दर आणि वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात कलिंगडाची लागवड थांबली आहे. लागवड मार्चच्या सुरुवातीपर्यंत सुरूच होती. परंतु कमी दर व वाढलेली उष्णता यामुळे आता लागवड थांबली आहे. लागवड यंदा डिसेंबरमध्ये अधिक होती. परंतु पिकात उत्पादन कमी आले व कमी दरामुळे नफाही हाती आला नाही.

कलिंगडाची लागवड खानदेशात डिसेंबरमध्ये सर्वत्र झाली होती. रमजान महिन्यात आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते. परंतु प्रतिकूल वातावरण व अधिकचा खर्च व कमी दर यामुळे उत्पादन घटले. परिणामी, मार्चअखेरची लागवड अनेकांनी टाळली आहे.

मार्चमधील जळगाव जिल्ह्यातही लागवड निम्मी घटली आहे. मागील हंगामात जिल्ह्यात मार्च व एप्रिलच्या सुरुवातीच्या कालावधीत कलिंगडाची लागवड बऱ्यापैकी झाली होती. एकूण लागवड ५०० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. परंतु यंदा ही लागवड अत्यल्प आहे. रमजान महिन्यातील दरांचा लाभ घेण्यासाठीची लागवड खानदेशात सुमारे आठ हजार हेक्टरवर झाली होती.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर भागांत अधिक लागवड झाली होती. नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील साक्री, धुळे, शिरपूर व अन्य भागांतही डिसेंबर व जानेवारीत मोठी लागवड झाली होती. परंतु मार्च महिन्याची लागवड जेमतेम २०० ते ३०० हेक्टरपर्यंतच आहे, असा अंदाज आहे.

मे महिन्यात लागवड कमी असण्याची शक्यता

कलिंगडाची लागवड पुढील ३० ते ३५ दिवसांत फक्त ५० ते ६० हेक्टरवर होईल. तर मे महिन्यातील लागवड यापेक्षा कमी असेल, अशी माहिती मिळाली. कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील लागवड ३०० ते ३५० हेक्टरपेक्षा अधिक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT