Watermelon Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Farming : कलिंगड पिकाची पुन्हा लागवड ; वाडा तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांच्या हाती ठोस उत्पन्न

Watermelon Cultivation : तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वीपासून हिवाळी शेतीची अर्थनीती कलिंगड पिकावर उभी राहत आली आहे. तालुक्यात डी प्लस झोन आल्याने कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

Team Agrowon

Vada News : वाडा : तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वीपासून हिवाळी शेतीची अर्थनीती कलिंगड पिकावर उभी राहत आली आहे. तालुक्यात डी प्लस झोन आल्याने कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तरुणांच्या हाताला काही प्रमाणात काम मिळू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र अनेक कारखाने विविध कारणास्तव बंद अवस्थेत आहेत. तरुणांच्या हाताला फारसे काम नसल्याने ठोस उत्पन्नाचे साधन म्हणून पुन्हा कलिंगड पिकाची लागवड शेतकरी करू लागले आहेत.

बदलत्या हवामानमुळे शेतीपेक्षा नोकरीच बरी असा पवित्रा येथील तरुणांनी घेतला होता. परंतु, आता काही प्रमाणात तालुक्यात पुन्हा शेतकरी हिवाळी पिकासाठी कलिंगडाकडे वळत आहेत. त्या दृष्टीने काही ठिकाणी भागीदारीमध्ये कलिंगडाचे पीक घेतले जात आहे. आंबिस्ते (बुद्रुक) येथील संजय पाटील या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर जागेत २४ हजार कलिंगड रोपांची लागवड केली आहे. यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संजय पाटील हे प्रगतिशील शेतकरी असून, ते कृषी क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त आहेत.

नैसर्गिक जलस्रोत बंद
कलिंगड पिकासाठी मुबलक पाणी आवश्यक असते. वाड्यात सर्वत्र कारखान्यांचे जाळे पसरल्याने नैसर्गिक छोटे-मोठे पाण्याचे ओहळ व नाले बंद झाले आहेत. या कारखान्यांमुळे येथील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तर दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा, खते, बी-बियाण्यांचे वाढते भाव आणि प्रदूषणामुळे कलिंगड पीक घेणे हळूहळू कमी होत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाडा तालुक्यात पूर्वी गावोगावी कलिंगडाचे पीक घेतले जात असे. शेतकरी भातकापणी झाली की, काही दिवसांतच कलिंगड पिकाच्या लागवडीकडे वळायचे. त्यासाठी मशागतीला सुरुवात करून मध्यम प्रकारच्या कलिंगडचे पीक घेतले जात असे.

सध्या तालुक्यातील मोजक्याच भागात कलिंगडाचे पीक घेतले जात आहे. या पिकाला पाणी जास्त लागत आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव व निसर्गाच्या लहरीपणाची भीती सतावत असते.
- संजय पाटील,
प्रगतिशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT