Department Of Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाणीवापर संस्थांचा राज्यभर विस्तार व्हायला हवा

Department Of Irrigation : जिल्ह्यातील पालखेड पाटबंधारे विभागातील वाघाड, पालखेड व ओझरखेड प्रकल्पामध्ये पाणी वापर संस्था आणि शासन यामध्ये जे समन्वयाचे दर्शन घडते.

मुकूंद पिंगळे

Nashik News : जिल्ह्यातील पालखेड पाटबंधारे विभागातील वाघाड, पालखेड व ओझरखेड प्रकल्पामध्ये पाणी वापर संस्था आणि शासन यामध्ये जे समन्वयाचे दर्शन घडते. त्यातून शेतकरी व शासन या दोघांनाही याचा फायदा होतो.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतरही सिंचन प्रकल्पांवरती पाणी वापर संस्था स्थापन होऊन विस्तार व्हावा, अशी अपेक्षा विदर्भ विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला यांनी येथे व्यक्त केली.

नाशिकमधील ‘मेरी’च्या पा. कृ. नगरकर सभागृहात सोमवारी (ता. २) पालखेड पाटबंधारे विभागातर्फे २०२३ चा सिंचननामा प्रकाशित करण्यात आला. उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणारे अधिकारी, कर्मचारी व पाणीवापर संस्थांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजेंद्र शुक्ला बोलत होते.

या प्रसंगी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, जितेंद्र पाटील, राघवेंद्र भाट व वैभव भागवत, वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक शहाजी सोमवंशी, पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित होते.

शुक्ला म्हणाले, की जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीवापर संस्था व शासनाचा योग्य समन्वय असल्याने सर्वांचा फायदा होतो. सिंचन क्षेत्र व पाणी वापर याबाबत जागरूकता निर्माण होऊन शेतकरी व शासन दोघांच्याही उत्पन्नामध्ये भर पडणार आहे असा आशावाद व्यक्त केला.

शहाजी सोमवंशी यांनी पालखेड पाटबंधारे विभागामार्फत पाणीवापर संस्थांसाठी करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणगौरवाबाबत गौरवोद्गार काढले. पालखेड पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT