Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scheme : सांगलीतील सिंचन योजनांच्या पाणीवापर संस्था कागदावरच

Agriculture Irrigation : टेंभू उपसा सिंचन योजनेचे ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, योजना सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना पाणी वेळेत देण्यासाठी सुमारे २३० पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत.

राज्य शासनाने कोयना, चांदोली धरणांतील पाणी वाटपापासून ते सिंचन योजनांच्या आवर्तन पद्धतीपर्यंत पूर्ण नियोजन केले.

त्यातील महत्त्वाची कडी ‘पाणी वापर संस्था’ आहेत. त्या कार्यान्वित झाल्याशिवाय पाणी वाटपात सुसूत्रता येणार नाही. मात्र, या पाणी वापर संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याचे चित्र आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेचे ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, योजना सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहे. विस्तारित टेंभू योजनेच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १०९ गावे आणि ४१ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. म्हैसाळ योजनेचे सुमारे १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

ताकारी योजनेतून १ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम सुरू असून ६५ गावांतील २४ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. दोन्ही विस्तारित योजना कार्यान्वित होतील.

जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणीपट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. ताकारी योजनेसाठी ७८, म्हैसाळसाठी ९२ तर टेंभूच्या लाभ क्षेत्रात ६० पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत.

पाटबंधारे विभागाने केलेल्या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.

शेतकऱ्यांना वेळेत पाणी देण्याचे नियोजन, पाणीपट्टी वसुलीचे काम यासह अन्य कामे या संस्थेच्या माध्यमातून होणार आहेत. मात्र, संस्था स्थापन करून तीन वर्षांचा काळ लोटला तरी, असला तरी, या संस्था केवळ कागदावरच आहेत. प्रत्यक्षात या संस्था कार्यान्वित कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सिंचनाखालील क्षेत्र

- टेंभू - ७८ हजार ६७३ हेक्टर

- म्हैसाळ - १ लाख ९ हजार हेक्टर

- ताकारी - १ लाख ४ हजार हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

Cotton Farmers Crisis: कापूस वेचणी दर स्थिर, मजूरटंचाईची समस्या मात्र कायम! शेतकऱ्यांसमोर नवे संकट

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT