Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Tourism : कोयना धरणात मुनावळेत जलपर्यटनास मंजुरी

Koyna Dam Update : कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर मुनावळे (ता. जावळी) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Satara News : कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर मुनावळे (ता. जावळी) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.

जलपर्यटन प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. बांधकामाचा खर्च हा पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दिला जाणार आहे. जल पर्यटनाशी संबंधित कामकाज तसेच प्रकल्पाचे प्रचालन हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत राबविण्यात येईल.

प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाबरोबर करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारातील तरतुदीनुसार करण्यात यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

कोयना धरण ‘शिवसागर जलाशय’ यावर मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याबाबत त्यानुसार प्रकल्पाची व्यवहारता, वित्तीय बाबी तपासून अनुसरून शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान, पहिल्या टप्यातील खर्चासाठी १३ कोटी ६१ लाख वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

वीस महिन्यांत काम होणार पूर्ण

जलपर्यटन विकसित करण्याकरिता पहिला टप्पा आठ महिन्यांत आणि दुसरा टप्पा २० महिन्यांत पूर्ण करण्यात यावा. जलपर्यटन विकसित करण्याची कार्यवाही कोयना धरण (शिवसागर जलाशयाच्या) ‘अ’ वर्ग प्रतिबंधित क्षेत्रात होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध द्याव्यात. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तसेच जलपर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेऊन जलाशयात मलजलप्रक्रिया केंद्र उभारणे, पर्यावरणस्नेही बोटींचा वापर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Power Tiller Care: पॉवर टिलरची देखभाल कशी करावी?

Kannad Naksha Project: कन्नड नक्शा प्रकल्पाचे काम पूर्ण

Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी

Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर

SCROLL FOR NEXT