Water Dam
Water Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Kalote Dam Water : ‘कलोते’तून लवकरच कालव्याला पाणी

Team Agrowon

Khalapur Irrigation News : कलोते धरणातील (Kalote Dam) डावा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील नागरिकांना पाणी समस्‍या जाणवू नये, यासाठी एक-दोन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

तालुक्यातील सिंचनासाठी पाणीसाठा राखीव असलेले कलोते-मोकाशी धरणातून डावा आणि उजवा असे दोन कालवे काढण्यात आले आहेत.

कालव्यामुळे खालापूरमध्ये उन्हाळी भात शेती तसेच भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. याशिवाय उन्हामुळे कोरड्या पडणाऱ्या कालव्यालगत विहिरी, बोअरवेलमधील पाणीसाठा वाढण्याची शक्‍यता आहे.

दोन्ही कालव्याला एक वर्षाआड पाणी सोडले जाते. परंतु गतवर्षी कालव्याचे चोरीला गेलेले पाइप तसेच कालव्याची डागडुजीमुळे पाटबंधारे विभागाने खालापूर भागात पाणी सोडले नव्हते.

याबाबत खालापूर नगरपंचायत, तसेच नागरिकांनी पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. परंतु कालव्याच्या अपूर्ण कामामुळे खालापूर शहर, आदिवासी वाड्यांलगत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या.

नगरपंचायतीवर टँकरने पाणी विहिरीत सोडण्याची वेळ आली होती. यंदा मात्र ही वेळ येऊ नये यासाठी खालापूर नगरपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला.

सिंचन क्षमता १५० हेक्‍टर

खालापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर ठाकूर वाडीलगत ५.२३ चौरस किलोमीटर क्षेत्रात कलोते-मोकाशी धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. १९७६ मध्ये कलोते मोकाशी धरण बांधताना या भागातील उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची पाण्याची गरज लक्षात घेउन धरण बांधण्यात आले.

धरणातून दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी १.२ किलोमीटर आहे. डावा कालवा जवळपास ५.८ किलोमीटर लांबीचा आहे. खालापूर, नडोदे, विणेगाव या भागातील २३५.०० हेक्टर सिंचनाखाली असून एकूण सिंचन क्षमता १५० हेक्टर इतकी आहे.

गतवर्षी कालव्याला पाणी न सोडल्याने खालापूर शहरातील अनेक विहिरी तसेच बोअरवेल कोरड्या पडल्या होत्या. त्यामुळे यंदा सातत्याने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला असून त्‍यासाठी प्रत्‍यक्ष भेट घेउन चर्चाही केली.
आकेश जोशी, नगरसेवक, खालापूर नगरपंचायत
खालापूर तालुक्‍यातील कलोते-मोकाशी धरणातील कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पाण्याचा प्रवाह कलोते भागात वळविण्यात आला आहे. दोन दिवसांत खालापूर कालव्याला पाणी सोडण्यात येईल.
संदेश मेंगाळ, उपअभियंता, पाटबंधारे विभाग कर्जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT