Water Supply Planning Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Water Issue : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या ४१२ गावे व ६१ वाड्यांमध्ये टंचाई स्थिती असून, तेथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या ४१२ गावे व ६१ वाड्यांमध्ये टंचाई स्थिती असून, तेथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. सद्यःस्थितीत ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्याचा २८५ गावांमधील ३४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जून अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले आहेत.

जिल्ह्यातील टंचाई निवारण उपाययोजनांचा गुरुवारी (ता. १६) जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. पी. झोड, भूजल सर्व्हेक्षणचे जीवन बेडवाल, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी तसेच उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सर्व तालुका व उपविभागीय अधिकाऱ्यांनी जेथे टॅंकर सुरू आहे. त्या गावांना प्रत्यक्ष भेटी द्याव्या. येत्या दोन दिवसांत या भेटी पूर्ण कराव्या. या भेटींमध्ये अधिकाऱ्यांनी पाण्याचे स्रोत, पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता, टॅंकरच्या फेऱ्यांच्या नोंदी, फेऱ्यांचे प्रमाणिकरण नोंदी,

टॅंकर भरण्यासाठी उपलब्ध होऊ शकणारे नजिकचे ठिकाण याची प्रत्यक्ष पाहणी करावी व गावकऱ्यांशी भेट घेऊन चर्चा करावी. पाणी पुरवठ्याचे नियोजन जून अखेरपर्यंत करावे, काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेटी देऊन पाहणी करावी. टॅंकर फेऱ्या तपासण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

चारा उपलब्धतेचे नियोजन

पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच पशुधनासाठी जेथे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे ती माहिती गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवावी. येत्या हंगामात चारा पिके घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी स्थानिक पशुवैद्यक दवाखान्यास भेट देऊन चारा पिकाच्या बियाण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

टॅंकर्सना जीपीएस लावा

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना म्हणाले, टॅंकर भरण्याची ठिकाणे वाढविण्यात यावी. तसेच टॅंकर्सना‘जीपीएस’ लावून त्यांच्या फेऱ्या तपासाव्यात. त्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा. जिल्ह्यात तलाव व धरणातील गाळ काढण्याच्या कामांना गती द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT