Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : ऐन पावसाळ्यात पुरंदरमध्ये ८२ टँकरने पाणीपुरवठा

Water Crisis : पावसाळा सुरू होऊन, तीन आठवडे उलटून गेल्यानंतर, पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळा सुरू होऊन, तीन आठवडे उलटून गेल्यानंतर, पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून पिण्यासाठी, पशुधनासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाणीबाबत मोठा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. तर तालुक्यातील ३५ गावठाणांसह, ३२१ वाड्या- वस्त्यांवर जवळपास ८२ पाण्याचे टँकर सुरू आहेत.

मागील वर्षी, अति अल्प पर्जन्यमान झाले होता. शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. केंद्रस्तरीय समितीने दुष्काळाची दाहकताही तपासली; मात्र त्यावरील उपाययोजना कुठल्याही प्रकारच्या करण्यात आल्या नाहीत. पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने चारा छावण्या चालू कराव्यात, विविध गावांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा डेपो चालू करावेत.

तर तालुक्यातील बंद योजना त्वरित चालू करावे, अशा विविध मागण्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांनी शासनाकडे वारंवार केल्या होत्या. मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्‍न शेतकरी आणि नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

टँकरची संख्या सातने कमी

पावसाळा सुरू होण्याआधी तालुक्यात एकूण ४२ गावठाणसह ३६३ वाड्या-वस्त्यांवर ९३ टँकरच्या माध्यमातून २८८ खेपा सुरू होत्या. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर ४२ गावांत सुरू असलेले ७ टँकरची संख्या कमी होऊन ३५ झाली आहे.

३६३ वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर आता ३२१ वाड्या-वस्त्यांवर सुरू आहेत. सद्यःस्थितीत ८२ टँकरच्या माध्यमातून २५६ टँकरच्या खेपा सुरू आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

...या ठिकाणी धावताहेत टँकर

सोनोरी, वाल्हे, वागदरवाडी, रीसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, जवळार्जुन, दौंडज, दिवे, झेंडेवाडी, साकुर्डे, पांडेश्‍वर, खळद, बोपगाव, नायगाव, सुकलवाडी, पिंगोरी, दौंडज, आंबळे, सिंगापूर, गुर्हळी, राख, नावळी, मावडी कडेपठार, आडाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी आदींसह तालुक्यातील अनेक गावांत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT