Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Water Crisis : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात पंधरा दिवसांत एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांची तहान भागणे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे.

मागील दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च बघता पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणण्याची वेळ आली असून, टँकरलॉबी पोसण्यासाठी टंचाई निर्माण केली जात असल्याचाही सूर उमटत आहे. लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

याचा विचार करून नगरपरिषदेने शहरातील नागरिकांची पुरेशी तहान भागविण्यासाठी मुबलक पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. शहराची तहान भागेल, अशी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना शहरात कार्यान्वित आहे.

नवीन योजनेचे कार्य प्रगतिपथावर सुरू आहे. आहे त्या जुन्या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र नियोजनाअभावी व पालिकेच्या अनास्थेमुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.

तर संपूर्ण जलवाहिनीला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळतीचे स्वरूप प्राप्त झाले असून, लाखो लिटर प्रक्रिया केलेले पाणी वाया जात असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून नागरिक व व्यवस्थेच्या लक्षात आणून दिले असताना.

देखील पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. शहरातील नागरिकांना गेली दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसांत एकवेळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांची तहान भागणे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांना टँकरच्या माध्यमातून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT