Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मुरबाडला पाणी टंचाईची झळ

Water Shortage : पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून मुरबाड तालुक्यात कोकण पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते; मात्र हे बंधारे नादुरुस्त झाले आहेत.

Team Agrowon

Murbad News : पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून मुरबाड तालुक्यात कोकण पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते; मात्र हे बंधारे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करून गावोगावी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

सध्या मुरबाड तालुक्यात सोळा गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या गावांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून मे महिन्यात ही संख्या वाढणार आहे. छोट्या बंधाऱ्यात अडविलेले पाणी त्याच जागी साठून राहते. त्याचा उपयोग शेती, गुरांना पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी होतो.

बंधाऱ्याच्या ठिकाणी जमिनीत मुरणाऱ्या पाण्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते. त्यातील काही पाणी पुन्हा नदी-नाल्यांत खालच्या बाजूला झिरपते. त्याठिकाणी पुन्हा दुसरा बंधारा बांधायचा व पाणी अडवायचे, अशी ही सोपी व कमी खर्चाची योजना आहे; परंतु ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही योजना राबवूनही त्याचा म्हणावा तसा फायदा ग्रामीण भागात झाला नाही. ग्रामीण भागात पाणीटंचाई उद्भवत आहे.

काय आहे कोकणी पद्धत?

कोकणात सर्वाधिक जास्त पाऊस पडतो; मात्र पावसाचे पाणी अडवण्याचा पुरेसा प्रयत्न केला जात नाही. तर पाणीटंचाईची झळ बसत असल्याने अनेकदा पाण्यासाठी मोठमोठे बंधारे बांधले जातात. त्यामुळे काही गावे विस्थापित होतात. याला पर्याय म्हणून नदी, नाल्यांवर सिमेंटचे छोटे बंधारे बांधायचे.

लोखंडी पत्रे किंवा लाकडी फळ्या टाकून पाणी अडवायचे. पावसाळा सुरू झाला की ते लोखंडी पत्रे किंवा लाकडी फळ्या काढून ठेवायच्या. पुन्हा पावसाळा संपत आला की पुन्हा त्या बंधाऱ्यावर लाकडी फळ्या किंवा लोखंडी पत्रे टाकून पाणी अडवायचे अशी ही सोपी पद्धत असते.

के.टी. बंधारे योजना निष्फळ

ज्या ग्रामपंचायत हद्दीत बंधारा बांधला, त्यांनी त्या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्तीकडे लक्ष ठेवणे गरजेचे होते; मात्र ग्रामपंचायतीकडे कर्मचारी नाहीत. तसेच निवडून आलेल्या सदस्यांना या बंधाऱ्याकडे लक्ष देण्यात स्वारस्य नव्हते. तर सार्वजनिक काम असल्याने त्यांच्याकडे ग्रामस्थांनीदेखील लक्ष दिले नाही. त्यामुळे तालुक्यात आता या बंधाऱ्याच्या फक्त भिंती दिसतात. अनेक बंधाऱ्याचे बांध नादुरुस्त होऊन वाहून गेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy Scam: मुळावर घाव घालणार का?

Farmers Demand: लोखंडी बैलगाडीला ७० टक्के अनुदान देण्याची मागणी

Solar Energy Project: अडगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध

Jalmanthan Meeting: पाणी प्रश्‍नांवर ‘जलमंथन’; मराठवाड्यात नव्या संवादाची सुरुवात

kadba Fodder Prices: अवकाळी पावसाचा फटका; कडबा महागला

SCROLL FOR NEXT