Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : कडेगाव, माळेगावात पाणीटंचाई कायम

Water Crisis : तालुक्यात मागील तीन दिवस भीज पाऊस झाला. त्याचा काही भागाला फायदा झाला आहे. मात्र, जिथे सिंचनाचे स्त्रोत नाही. तिथे अद्याप देखील टंचाईची समस्या कायम आहे.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात मागील तीन दिवस भीज पाऊस झाला. त्याचा काही भागाला फायदा झाला आहे. मात्र, जिथे सिंचनाचे स्त्रोत नाही. तिथे अद्याप देखील टंचाईची समस्या कायम आहे. त्यात तालुक्यातील कडेगाव आणि माळेगाव या दोन गावांचा समावेश आहे. या दोन्ही गावातून जाणाऱ्या लहुकी नदीला मागील दोन वर्षात एकदाही पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे.

प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांचे कुठलेही सर्वेक्षण न करता शासकीय शिरस्ता पाळत ३१ ऑगस्टपासून टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद केले आहेत. शासनाच्या अशा अंधाधुंद धोरणामुळे कडेगाव आणि माळेगाव येथील नागरिक भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा शोध घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

बदनापूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून जेमतेम पाऊस पडत आहे. मागच्या वर्षी तर पावसाने वार्षिक सरासरी देखील गाठली नव्हती. यंदा श्रावणात पाऊस धाऊन आला खरा; मात्र त्याने काही भागात दुजाभाव केला. त्यात रोषणगाव मंडळातील कडेगाव, माळेगाव, वरुडी, कुसळी आदी गावे भरडली गेली आहेत.

अर्थात काही गावातील ग्रामपंचायतींनी किमान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काही स्त्रोत तयार केले आहेत. मात्र, आजघडीला कडेगाव आणि माळेगाव अशी दोन गावे चक्क पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ आहेत.

त्याला कारण देखील तसे आहे, या दोन्ही गावांत दोन वर्षात अगदीच तुरळक पाऊस झाला. या गावातून जाणारी लहूही नदी नेहमी कोरडीठाक पडलेली असते. त्यामुळे सिंचन आणि पाणीसाठा हा विषय या दोन्ही गावांसाठी नगण्य आहे. एकूणच अशा परिस्थितीत पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी दोन्ही गावे टंचाईच्या संकटात सापडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार 

Pulses Sowing: बारामतीत कडधान्य क्षेत्रात यंदा वाढ

Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT