Water Scarity Akola agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarity Akola : अकोल्यात पाणीटंचाई निवारण उपाययोजना मंजूर

Water Scarcity Alleviation Akola : अकोला व बार्शीटाकळी तालुक्यांतील ४९ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या ६१ उपाययोजना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी (ता. २०) मंजूर केल्या आहेत.

Team Agrowon

Akola Water Scarity : पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोला व बार्शीटाकळी तालुक्यांतील ४९ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या ६१ उपाययोजना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी (ता. २०) मंजूर केल्या आहेत. संबंधित गावातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार असून या कामांसाठी एक कोटी १७ लाख ४ हजार ७२६ रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना मंजूर करण्यात आल्याने पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवासी नागरिकांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येकवर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येताे. त्याअंतर्गत या वर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने यंदा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यास विलंब केला.

परंतु अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार करून जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे सादर केला होता. त्याला मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुंभार यांच्या मंजुरीसाठी आराखडा सादर करण्यात आला. आराखड्याला जिल्हाधिकारी कुंभार यांनी १३ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली होती. दरम्यान, आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या गावांपैकी ४९ गावांमध्ये कूपनलिका व विंधन विहिरीच्या ६१ उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी कूपनलिकेच्या ४० उपाययोजना मंजूर केल्या आहेत. विंधन विहिरीच्या २१ उपाययोजना मंजूर केल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक १९ उपाययोजना तेल्हारा तालुक्यासाठी आहेत. त्यानंतर तेल्हारा तालुक्यात १३, अकोल्यामध्ये सात, बार्शीटाकळी तालुक्यात सहा, मूर्तिजापूरमधील पाच उपाययोजनांचा समावेश आहे.

कामांना २० जूनची डेडलाइन

कूपनलिका आणि विंधन विहिरींच्या उपाययोजनांची कामे २० जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा. योजनेचे काम पूर्ण होताच त्याबाबत कार्यालयास कळविण्यात यावे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असा उल्लेख जिल्हाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT