Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव सादर करा

Water Crisis : उन्हाळा कालावधी जवळ येत असतांना काही गावांमधून पाणीटंचाईची माहिती मिळत आहे.

Team Agrowon

Chh. SambhajiNagar News : उन्हाळा कालावधी जवळ येत असतांना काही गावांमधून पाणीटंचाईची माहिती मिळत आहे. तेव्हा तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून टंचाई नियोजनासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (ता.२५) दिले.

जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

तर जिल्हा मुख्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके सहभागी झाले होते.पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी.

पाण्याची उपलब्धता, त्याचे स्रोत, मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता इ.बाबत पाहणी करावी. त्यानुसार आठ दिवस आधी प्रस्ताव पाठवावा. याच कालावधीत पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीही करावी. या सोबतच रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा बाबत नियोजन करावे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सौर ग्राम तयार करावयाचे असल्याने त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची पाहणी करून निवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT