Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १५) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले. हा पंधरवडा १५ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब बिनवार, कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार, ‘वाल्मि’ विभाग प्रमुख अविनाश गरुडकर, कार्यकारी अभियंता जाधव, मुख्य लेखापरीक्षक आर.डी. मुंदडा, निवृत्त कार्यकारी संचालक नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जलपूजन करण्यात आले. उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की जल व्यवस्थापन कृती कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. त्यात लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करावी. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यात सहभागी व्हावे.
पाणी व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने गाव तिथे वड, जल पुनर्भरण, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात कृषी जलसंपदा, जलसंधारण या सर्व विभागांनी एकत्रित येऊन उपाययोजना कराव्या. नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग ही त्यात आवश्यक आहे. मुख्य अभियंता मुंदडा, संतोष तिरमनवार, अविनाश गरुडकर यांनी जल व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. कार्यकारी अभियंता सबबिनवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अश्विनी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत जाधव यांनी केले.
...असा आहे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा
१७ एप्रिल- स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण, १८- शेतकरी पाणीवापर संस्था यांच्याशी संवाद, १९ - भूसंपादन, पुनर्वसन अडचणींचे निराकरण व संयुक्त कालवा पाहणी, २० - कालवा स्वच्छता अभियान, २१ - उपसा सिंचन पाणी वापर तक्रारी निरसन, २२- अनधिकृत पाणी वापर (वाणिज्य व औद्योगिक) प्रकरणे शोध मोहीम, २३- पीक पद्धत, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन बाबत कृषी विभाग, जलसंपदा विभाग संयुक्त मार्गदर्शन, २४- सिंचन-ई प्रणाली, पाणी दर.
पाणीपट्टी आकारणी प्रकरणांचा आढावा, २५- विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, २६- पाण्याचा पुनर्वापर न करता धरणात, नदीत सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या प्रकरणांचा शोध घेणे, २७- आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, २८- महसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या संपादित जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन कारवाई, २९ पाणीवापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा, ३० पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा.
अभियंता मुंदडा, संतोष तिरमनवार, अविनाश गरुडकर यांनी जल व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. कार्यकारी अभियंता सबबिनवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अश्विनी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत जाधव यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.