Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : जळगावात विविध भागांत पाणीपातळी घटली

Water Scarcity : यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस केवळ ८८.८ टक्के झाला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळीत दीड मीटरने घट झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस केवळ ८८.८ टक्के झाला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळीत दीड मीटरने घट झाली आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव तालुक्यांमधील पाणीपातळीत घट झाली आहे.

यामुळे पाण्याचा कमी वापर आतापासूनच करण्याचे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाची कृपादृष्टी राहिली. त्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्यातही फार थोडे दिवस पर्जन्यमान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापी पट्ट्यात चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ८८.८ टक्के पाऊस झाला आहे.

सप्टेंबरनंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून जिल्ह्याची पाणीपातळी तपासली जाते. निरीक्षणासाठी काही विहिरी निश्चित करण्यात येतात. यंदाही अशी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे.

नऊ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, बोदवड, यावल, एरंडोल, जामनेर या सहा तालुक्यांमध्ये भूजलपातळीत वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांची पाणीपातळी परिस्थिती समाधानकारक असली, तरी गिरणाकाठच्या चाळीसगाव तालुक्याने मात्र प्रशासनाची चिंता वाढविली आहे.

पाणीपातळीतील घट अशी

तालुका घट मीटरमध्ये

जळगाव ०.२६

धरणगाव ०.७५

चोपडा ०.२१

अमळनेर ०.७४

भडगाव ०.१०

पाच तालुक्यांतील पाणीपातळीतील घट सर्वसाधारण दिसत असली तरी या तालुक्यांमध्ये पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT