Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Water Stock : वाढलेले तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, उपसा आदी कारणांमुळे लघू तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

Team Agrowon

Parbhani News : वाढलेले तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, उपसा आदी कारणांमुळे लघू तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. गावे, वाड्या, वस्त्यांमधील पाणी टंचाईचे संकट दिवसागणिक अधिक गहिरे होत आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाकडील गुरुवारी (ता. २) पर्यंतच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यातील २२ पैकी १० लघू तलाव कोरडे पडले आहेत. तर ८ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दोनपैकी मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात केवळ १ टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी (ता. २) घेण्यात आलेल्या लघू तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव, भोसी, आडगाव हे १० लघू तलाव कोरडे पडले आहेत. पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड), टाकळगाव (ता. गंगाखेड), कवड (ता. जिंतूर),

मांडवी (ता. जिंतूर), पाडळी (ता. जिंतूर) या ८ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. झरी (ता. पाथरी) तलावामध्ये ६८ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) तलावात १६ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) तलावात १५ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात २ टक्के मिळून ४ लघू तलावांमध्ये सरासरी १.९६९ दलघमी म्हणजेच ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

२०२३ मध्ये २ मे रोजी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६.८०२ दलघमी (१६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गुरुवारी (ता. २) जिल्ह्यातील निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात ०.१६० दलघमी (१ टक्का) पाणीसाठा शिल्लक होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. २०२३ मध्ये २ मे रोजी करपरा मध्यम प्रकल्पात ७.७६३ दलघमी (३१ टक्के) व मासोळी मध्यम प्रकल्पात १०.०७५ दलघमी (३७ टक्के) तर दोन प्रकल्पांमध्ये सरासरी १७.८३८ दलघमी (३४.२८ टक्के) उपयुक्त पाणासाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT