Pune News : पुरंदर उपसा योजनेचे पंप सुरू करण्यात आले असून १५ दिवसांच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार संजय जगताप यांनी योजनेच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार योजनेच्या अधिकारी यांनी वेळापत्रक जाहीर केले.
यामध्ये योजनेच्या माळशिरस वितरिकेतून दि. २२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत आंबळे स्कोअरवालमधून आंबळे आणि पिसर्वे भागाला पाणी सोडण्यात येणार आहे. दि. २६ ते २८ फेब्रुवारी पर्यंत माळशिरस स्कोअरवॉलमधून माळशिरस परिसर. दि. १ ते ४ मार्चपर्यंत सबमेन १, मायनर ८ आणि सबमेन २ मायनर ६ मधून पांडेश्वर, माळशिरस, टेकडी आणि नायगाव.
दि. ५ ते ९ मार्चपर्यंत सबमेन १, सबमेन २ आणि पोंढे नवीन लाइनमधून पोंढे, नायगाव, माळशिरस आणि टेकवडी. दि. १० ते १५ मार्चपर्यंत सबमेन ३ नवीन पोंढे लाइन, सबमेन १ आणि सबमेन २ मधून पोंढे, राजुरी, नायगाव, माळशिरस आणि पांडेश्वर परिसरात पाणी देण्यात येणार आहे.
तर योजनेच्या दिवे वितरिकेतून दि. २२ ते २४ फेब्रुवारीपर्यंत वनपुरी स्कोअरवॉल, मायनर ३, मायनर २ मधून वनपुरी, पारगाव, सिंगापूर आणि कुंभारवळण. दि. २५ ते २८ फेब्रुवारी पर्यंत नेदबाई स्कोअरवॉल आणि मायनर ४ मधून उदाचीवाडी आणि पारगाव. दि. १ ते ३ मार्चपर्यंत लवांडे स्कोअरवॉल आणि लेंडी स्कोअरवॉल मधून सिंगापूर.
दि. ४ ते ६ मार्चपर्यंत माणकेश्वर स्कोअरवॉल आणि इनामदार स्कोअरवॉल मधून वाघापूर. दि. ७ ते १२ मार्चपर्यंत गुऱ्होळी स्कोअरवॉल आणि मायनर ५ मधून गुऱ्होळी आणि कुंभारवळण आणि दि. १२ ते १५ मार्चपर्यंत दिवे पंपहाऊस क्रं. ६, सोनोरी, माळवदकर स्कोअरवॉल, चुनाखाण मायनर व सोनोरी स्कोअरवॉलमधून दिवे, सोनोरी, काळेवाडी, झेंडेवाडी, ढुमेवाडी आणि पवारवाडी परिसरात पाणी देण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.