Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Water Scarcity : जालना जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

Water Crisis : मागील वर्षी जिल्ह्यात असमतोल आणि अल्प पाऊस झाल्याने यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला तब्बल १५६ टॅंकर सुरू करावे लागले आहेत.

Team Agrowon

Jalna News : मागील वर्षी जिल्ह्यात असमतोल आणि अल्प पाऊस झाल्याने यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला तब्बल १५६ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्पांनी तळ गाठला असून, केवळ १२.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे जूनपर्यंत हा साठा पुरू शकतो.

जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. हे ६४ प्रकल्प पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले तर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत नाही. परंतु, गतवर्षी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पांमधील पाणी तळाला गेले आहे.

विशेष म्हणजे या मध्यम व लघू प्रकल्पांच्या क्षेत्रात शेकडो गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. प्रकल्पाचे पाणी कमी झाल्यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळीही कमी होते.

सध्या सात मध्यम प्रकल्पांत केवळ १३.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर, ५७ लघू प्रकल्पांमध्ये ११.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात जून महिन्यात जोरदार पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईची भीषणता अजून वाढण्याची शक्यता आहे.

मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती

कल्याण गिरजा (ता. जालना) ः १८.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

कल्याण मध्यम (ता. जालना)ः जोत्याखाली पाणी

अप्पर दुधना (ता. बदनापूर) ः २७.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जुई मध्यम (ता. भोकरदन) ः १७.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा

धामना मध्यम (ता. भोकरदन) ः २७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जिवरेखा मध्यम (ता. जाफराबाद) ः ८.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

गल्हाटी मध्यम (ता. अंबड) ः ६.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT