Amaravati News : भूगर्भातील पाणीपातळी वाढावी व शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळावी, या उद्देशातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत जिल्ह्यात ४३८ कामे करण्यात आली आहेत. यावर २०.१२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ८१ कामे प्रगतीवर असल्याची माहिती मृद् व जलसंधारण विभागाने दिली.
रब्बी हंगाम आटोपताच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्रारंभ करण्यात येतो. यंदा नऊ विभागांमार्फत १ हजार ७४५ कामांचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक ८२९ कामे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून करण्याचे नियोजन आहे. आराखड्यातील एकूण कामांपैकी १ हजार २८१ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली.
त्यासाठी १०६ .७१ कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. शासनाने यातील ६६९ कामांना व त्यासाठी ८४.४० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियान दोनमध्ये ५७२ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यासाठी ६८.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यामध्ये वर्ष २०२३-२४ मधील १०.९ कोटींच्या ७२ व वर्ष २०२४-२५ मधील ३६६ कामांचा समावेश आहे.
ही सर्व ४३८ कामे पूर्ण झाली असून त्यावर २०.१२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. विद्यमान स्थितीत ८१ कामे सुरू असून, त्यासाठी ९.७१ कोटी रुपये खर्चण्यात येणार आहे.अभियानांतर्गत नाला खोलीकरण, गावतलाव, गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट, अशी कामे करण्यात आली आहेत. यामुळे आगामी पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्याऐवजी थांबवता येणार आहे. याचा उपयोग पाणी जमिनीत मुरून पाणीपातळी वाढण्यासोबतच ते सिंचनासाठी उपयोगात येणार आहे.
यंत्रणानिहाय कामे व खर्च
यंत्रणा कामांची संख्या खर्च (लाख रुपये)
मृद व जलसंधारण ९२ ६४९ .२५
लघू सिंचन (जिल्हा परिषद) ७९ ६५४.८८
कृषी विभाग ७ ७.६१
भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा २०१ १०८.९०
वन विभाग ४ ४९.६५
अमरावती पाटबंधारे ११ v
मध्यम व लघू पाटबंधारे विभाग अचलपूर २० १०५.१८
अप्पर वर्धा पाटबंधारे विभाग २३ ३२४.६६
सामाजिक वनीकरण १ ६.८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.