Paisewari  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : वाशीमची हंगामी पैसेवारी सरासरी ६४ पैसे जाहीर

Kahrif Season 2024 ; यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची सरासरी हंगामी पैसेवारी ६४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची सरासरी हंगामी पैसेवारी ६४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूली गावे असून ४६ मंडलांमध्ये ही पैसेवारी काढण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाशीम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे असून ९ मंडल आहेत. या सर्व १३१ गावांची प्रमुख पिकांची काढण्यात आलेली सरासरी हंगामी (नजर अंदाज) पैसेवारी ६७ पैसे आहे. या तालुक्यात पिकाखालील क्षेत्र २४ हजार ३४६ हेक्टर आहे. मालेगाव तालुक्यात १२२ गावे असून ८ मंडल आहेत.

या सर्व १२२ गावांची प्रमुख पिकांची पैसेवारी ५९ पैसे आहे. पिकाखालील क्षेत्र ५५ हजार ७७९ हेक्टर आहे. रिसोड तालुक्यात १०० महसुली गावे असून ८ मंडले आहेत. या सर्व १०० गावांची गावांची प्रमुख पिकांची काढण्यात आलेली पैसेवारी ६३ पैसे एवढी आहे. तालुक्यात २७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्र आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३७ महसुली गावे असून ७ मंडले आहेत. ४६ हजार ६२८ हेक्टर एवढे खरीप क्षेत्र आहे.

या सर्व १३७ गावांची गावांची प्रमुख पिकांची पैसेवारी ६४ पैसे निघाली. कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावे असून ८ मंडले आहेत. या गावांची प्रमुख पिकांची पैसेवारी ६६ पैसे निघाली. या तालुक्यात ५० हजार ७०१ हेक्टर क्षेत्र आहे.

तर मानोरा तालुक्यात १३६ गावे असून ६ मंडले येतात. या तालुक्याची पैसेवारी ६३ पैसे आहे. पिकाखालील क्षेत्र ४४ हजार २२३ हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी सरासरी ६४ पैसे इतकी आली आहे. खरिपात २ लाख ४९ हजार ४३५ हेक्टर क्षेत्र आहे.

वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मोसमात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सरासरीच्या १०० टक्क्यांवर पाऊस झाला. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, तूर पिकांसह इतरही खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगामासाठी यंत्रणांनी केलेल्या अहवालानुसार पैसेवारीचा अहवाल तयार करण्यात आला. या नुसार जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सुद्धा ६४ पैसे काढण्यात आली. एकीकडे खरीप हंगामाचे उत्पादन प्रचंड घटले घटले असताना जिल्ह्याची पैसेवारी ६४ पैसे निघाल्याने शेतकरी आगामी काळात शासकीय मदतीपासून वंचित राहतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- शुभम खडसे, शेतकरी, शेलुखडसे, ता. रिसोड जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

SCROLL FOR NEXT