Washim Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Washim Market Committee Election : वाशिम बाजार समिती निवडणुकीत राजकीय घडामोडी वाढल्या

सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक रंगात आली आहे. भरलेल्या नामनिर्देशन पत्रांवरील हरकतींमुळे निवडणुकीत राजकीय ट्विस्ट वाढले आहे.

Team Agrowon

Washim Election Update : वाशीममध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक (Washim Agriculture Produce Market Committee Election) रंगात आली आहे. भरलेल्या नामनिर्देशन पत्रांवरील हरकतींमुळे निवडणुकीत राजकीय ट्विस्ट वाढले आहे. हरकतीचा मुद्दा सहा वर्षांनंतर उकरून काढत बाजार समितीच्या भावी राजकारणातील संचालकांना अडविण्याचा राजकीय फंडा वापरला जात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोमात होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले आहेत. वाशीम बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बाजार समितीच्या निवडणुकीकडे आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीची फाटाफूट होऊन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकवाक्यता नाही. अशा परिस्थितीत निवडणूक चुरशीची होत असताना नामनिर्देशन पत्र भरलेल्या माजी संचालकांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सहा वर्षांपूर्वी न्यायालयाने संचालक मंडळ बरखास्त करीत त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केले होते. हाच मुद्दा उपस्थित करत सध्या नामनिर्देशन पत्र भरलेल्या माजी संचालकांच्या नामनिर्देशन पत्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत घेण्यात आली.

मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळल्यानंतर आता जिल्हा उपनिबंधकाकडे अपिल दाखल करण्यात आले आहे. या अपिलावर गुरुवारी (ता.२०) सुनावणी होणार आहे. या हरकतीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

सहा वर्षांपूर्वीचे बाजार समितीचे राजकारण वेगवेगळ्या कारणांनी गाजले होते. लोकनिर्वाचित संचालक मंडळाच्या बडतर्फीनंतर चार प्रशासक मंडळे शासनाने बाजार समितीवर बसवली होती. ही प्रशासक मंडळेही वादग्रस्त ठरली होती.

त्या पात्र-अपात्रतेत बाजार समितीच्या मालकीच्या जिनिंगच्या जागेचा तिढाही अनेकांना नडला होता. आता निवडणूक झाल्यावर नापसंद संचालक सत्तारूढ होऊ नये यासाठी जिल्ह्यातील काही राजकीय धुरीणांनी देव पाण्यात घातल्याची चर्चा आहे.

नामनिर्देशन पत्रावरील हरकतीने अनेक संचालक व प्रशासक निवडणुकीचा प्रचार सोडून कायदेशीर लढाईत गुंतले आहेत. परिणामी, प्रचारावर याचा परिणाम होत असून, याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. गुरुवारी नेमका काय निकाल येतो यावर पुढील लढाई अवलंबून दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT