Soybean Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी: सोयाबीनला ८ हजारांचा हमीभाव हवा

Soybean Market : वाशीम हा जिल्हा सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला किमान ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठांना जीएसटी मुक्त करावे, अशी मागणी जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील प्रगतिशील शेतकरी हेमंत देशमुख यांनी कृषिमंत्री माणिकरावे कोकाटे यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने कोकाटे यांनी अमरावती विभागीय परिसंवाद घेतला. या वेळी जिल्ह्यातून देशमुख यांनी मागण्या मांडल्या. या वेळी जिल्ह्यातील जवळपास २० प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

वाशीम हा जिल्हा सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. मात्र काही वर्षांपासून या पिकाची उत्पादकता कमी झाली आहे. बाजारभाव कोसळले तर दुसरीकडे कृषी निविष्ठांचे दर प्रचंड वाढले आहेत.

त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्चसुद्धा वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. सोयाबीनला ८ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा. कृषी निविष्ठा जीएसटी करमुक्त करण्यात आल्या पाहिजेत, अशी सूचना देशमुख यांनी केली.

देशमुख यांच्या प्रमुख मागण्या...

गोदामांची उभारणी करावी, बांधकामासाठी अनुदान द्यावे.

शेती अवजारे हे लॉटरी पद्धतीचा अवलंब न करता मागेल त्याला द्यावीत.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा.

वाशीम जिल्ह्याला सक्षम करावे.

शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण कराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT