Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सून पावसाची प्रतीक्षाच, धूळवाफ पेरण्या अडचणीत

Kharif Sowing Waiting : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल होऊनही अद्याप कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी न झाल्याने धूळवाफ पेरण्या अडचणीत आल्या आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल होऊनही अद्याप जिल्ह्यात पावसाच्या सरी न झाल्याने धूळवाफ पेरण्या अडचणीत आल्या आहेत.

जूनचा पहिला आठवडा संपला. अद्याप पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रही कोरडे जाण्याची शक्यता असून, सुमारे ३०० हेक्टरवर झालेल्या धूळवाफ पेरण्या पावसाविना अडचणीत सापडल्या आहेत. गेली दोन दिवस ढग वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जून सुरू झाला तरी आकाश कोरडे ठाक आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मे मध्ये एकच हलका पाऊस झाला. यानंतर खरिपातील शेतीच्या मशागतीला वेग आला होता. संपूर्ण कामे यंदा पूर्ण झाली. मात्र, नंतर पाऊस न झाल्याने खरिपाच्या धूळवाफ पेरण्या खोळंबल्या आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे सांगितले आहे. गेली दोन दिवस ढग वाहत आहेत. येत्या दोन - तीन दिवसांत पाऊस झाला तर पेरणीची झुंबड उडणार आहे. जिल्ह्यात १ लाख ९६ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे.

साधारणतः २५ मेपासून धूळवाफ पेरण्या सुरु होतात. जूनमध्ये उगवण होऊन मृग नक्षत्रात भाताची कोळपण केली जाते. विहिरीचे, नदीचे पाणी उपलब्ध असलेल्या पेरण्या झालेल्या ठिकाणी एक कोळपण मिळाली आहे.

जूनचा मृग नक्षत्रात अद्याप पाऊस झालाच नाही. परिणामी धूळवाफ पेरण्यात खोळंबल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील करवीर, पन्हाळा, राधानगरी तालुक्यात तालुक्यात पेरण्या झाल्या. सुमारे ३०० हेक्टरवर भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. जिरायती डोंगरी भागात झालेल्या भाताच्या पेरण्या पावसाविना अडचणीत सापडल्या आहेत.

आडसाली ऊस पाण्याविना लागला वाळू

खरिपात भात, खरीप ज्वारी, नागली, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कारळा, सोयाबीन पिके घेतली जातात. पाऊस नसल्याने पेरण्या थांबलेल्या आहेत. सर्वत्र बियाणे उपलब्ध असून, येत्या दोन दिवसांत पाऊस झाला तर बियाणे खरेदी होईल आणि भात पेरणीला सुरुवात होईल अशी आशा आहे. आडसाली ऊसपीक पाण्याविना वाळू लागले आहे.

खरिपातील सुमारे ३०० हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. जिल्ह्यात खते बियाणे पुरेसे उपलब्ध आहेत.
दनात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
पाचाकटेवाडी डोंगरातील वस्ती असून, सुमारे शंभर एकर अधिक भाताचे पीक घेतले जाते. आतापर्यंत एकही पाऊस झाला नाही. यामुळे पेरण्या सुमारे पंधरा दिवस पुढे गेल्या आहेत. भाताचा तरवा टाकण्याची शेती जागा भाजून तयार आहे. आता एका पावसाची प्रतीक्षा आहे.
शरद पाचाकटे, शेतकरी, पाचाकटेवाडी, ता. करवीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT