Laadki Bahin Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Laadki Bahin Scheme: लाडकी बहीणमुळे सरकारची अवस्था भिकाऱ्यासारखी: वडेट्टीवार

Shiv Bhojan Yojana: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक स्थिती ढासळली असून, इतर महत्त्वाच्या योजनांना कात्री लागल्याचा आरोप त्यांनी केला.

Sainath Jadhav

Nagpur News: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक स्थिती ढासळली असून, इतर महत्त्वाच्या योजनांना कात्री लागल्याचा आरोप त्यांनी केला. शिवभोजन थाळी योजनेसारख्या गरिबांसाठीच्या योजनांचे अनुदान रखडले आहे. यामुळे सरकारची अवस्था भिकाऱ्यासारखी झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

शिवभोजन थाळी योजने अंतर्गत गरिबांना १० रुपयांत जेवण मिळायचे. परंतु, आता ही योजना आर्थिक अडचणींमुळे अडखळली आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचे पैसे वळवले गेले. आदिवासी, समाज कल्याण आणि ओबीसी विभागांचे निधी या योजनेसाठी वापरले गेले, ज्यामुळे या विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे.

त्यांनी सरकारला प्रश्न केला की, जर लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नव्हते, तर कर्ज का घेतले नाही? त्याऐवजी इतर योजना बंद करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.वडेट्टीवार यांनी सरकारच्या कर्जाच्या धोरणावरही बोट ठेवले. ते म्हणाले, "महाराष्ट्रावर सध्या १० लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

तरीही सरकारने अदानीसारख्या व्यावसायिकांना ११,५०० एकर जमीन दिली, ज्याची किंमत २ लाख कोटी रुपये आहे.ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरली असती, तर बरे झाले असते. पण सरकार महाराष्ट्राला गुजरातला गहाण ठेवत आहे." त्यांनी सरकारला विचारले की, गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान का मिळाले नाही? सरकारने स्पष्टपणे सांगावे की त्यांच्याकडे पैसे नाहीत, असेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकांबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, त्यामुळे जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय अधिकारांवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री किती ब्रेक लावतात, हे पाहावे लागेल." या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT