Vidhan Bhavan Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhan Parishad Voting : विधान परिषदेसाठी आज होणार मतदान

Team Agrowon

Mumbai News : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने नेमके गणित कुणाचे जुळणार याकडे लक्ष लागले आहे. विधिमंडळांच्या मध्यवर्ती सभागृहात आज (ता. १३) मतदान होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचा शरद पवार गट वगळता सर्व पक्षांनी आपले आमदार सुरक्षित स्थळी हॉटेलवर मुक्कामी ठेवले आहेत.

अकराव्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की दोघांना आपापसांत झुंज द्यावी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. गुप्त मतदानामुळे मतांची फाटाफूट अटळ असल्याचे अंदाजही वर्तविले जात आहेत.

२७ जुलै रोजी रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी विधानसभेच्या २८८ पैकी २७४ सदस्य मतदान करतील. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या दरम्यान मतदान होईल. त्यानंतर तासाभरात मतमोजणी सुरू केली जाईल. पसंती क्रमाने मतदान होणार असून राष्ट्रवादीचा शरद पवार गट शेकापच्या जयंत पाटील यांना मतदान करेल असे सांगितले जात आहे.

तर काँग्रेसने प्रथम पसंतीचे मत प्रज्ञा सातव यांना, तर दुसरे मत शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांना देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मतमोजणीसाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला असून, आकड्यांच्या खेळात जो जिंकेल तोच निवडणूक जिंकेल असे बोलले जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे जयंत प्रभाकर पाटील हे महायुतीच्या पाठिंब्याने आणि सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध ठेवून असलेले ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे तगडे उमेदवार निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीत रंग भरला गेला आहे.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाला आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT