Election Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : शेताच्या बांधावर जाऊन मतदार जनजागृती

Voter Awareness : पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुर्गम आदिवासी भागात मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले होते.

Team Agrowon

Pune News : पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुर्गम आदिवासी भागात मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले होते. त्यामुळे याठिकाणी मतदार जनजागृती केल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली.

३६ शिरूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत १९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान सुरू आहे.

१३ मे रोजी शिरूर लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या गावात विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे.

त्या अंतर्गत आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील पांचाळे बुद्रुक येथे मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, त्यामुळे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तेथील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आंबेगाव शिप बदकाच्या वतीने गृहभेटीचे नियोजन केले.

यावेळी पथकाचे प्रमुख सुनील भेके सदस्य सचिन तोडकर, विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT