Drone Pilot Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Pilot Training : ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेसाठी ‘वनामकृवि’चा ‘ग्राउंडजिरो’शी करार

Agriculture Drone : कृषिक्षेत्रात काटेकोर व अचूक पद्धतीने विविध कामे करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढणार आहे.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणी येथे अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था स्‍थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व मुंबई येथील मे. ग्राउंडजिरो एरोस्‍पेस लिमिटेड यांच्‍यात नुकताच (ता. ५) सामंजस्य करार करण्‍यात आला.

या करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि मे. ग्राउंडजिरो एरोस्‍पेस लिमिटेडचे राहुल आंबेगावकर तसेच विद्यापीठामार्फत डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. विशाल इंगळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी डॉ. राहुल रामटेके, प्रफुल्‍ल बेद्रे, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. रवी शिंदे, डॉ. अनिकेत वाईकर आदी उपस्थित होते.

कृषिक्षेत्रात काटेकोर व अचूक पद्धतीने विविध कामे करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढणार आहे. विविध पिकांत कीड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापनासाठी, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोनच्या वापरासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखून दिले आहेत.

त्यानुसार ड्रोन चालविण्यासाठी ड्रोन पायलट परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्‍या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो. या करारामुळे पीकनिहाय ड्रोन वापर संशोधनास चालना मिळेल. शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे, फवारणीसाठी विविध प्रकारांचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने, काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळेल.

कुलगुरू डॉ. मणी अध्‍यक्ष असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने नऊ पिकांमध्ये ड्रोनचा सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबत निश्‍चित केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) केंद्रीय कृषी व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषी, सहकार व शेतकरी कल्‍याण विभागाने प्रसारित केली आहेत. मृदा व पीक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी डॉ. इंद्र मणी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीचे कार्य चालू आहे. ही समिती विविध पिकांमध्‍ये ड्रोन वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्‍चित करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT