Hivare Bazar Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : हिवरे बाजार भेटीतून जीवनात प्रेरणा मिळते : डॉ. शिशिर चंद्र

Hivare Bazar : हिवरेबाजार गावाने लोकसहभाग, श्रमदानातून आणि एकोप्यातून विकास साधला. नावलौकिक निर्माण केला. अनेक गावांसमोर आदर्श निर्माण केला.

Team Agrowon

Ahilyanagar News : हिवरेबाजार गावाने लोकसहभाग, श्रमदानातून आणि एकोप्यातून विकास साधला. नावलौकिक निर्माण केला. अनेक गावांसमोर आदर्श निर्माण केला. येथे आल्यावर जीवनात नक्कीच प्रेरणा मिळते, असे मत अजिम प्रेमजी फाउंडेशनचे डॉ. शिशिर चंद्र यांनी व्यक्त केले.

डॉ. शिशिर चंद्र यांनी हिवरेबाजारला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी चंद्र यांना कामाची माहिती दिली. डॉ. चंद्र म्हणाले, हिवरे बाजार भेटीतून नवी प्रेरणा मिळाली.

आत्तापर्यंत हिवरेबाजारच्या कामाचे वृत्तपत्र, माध्यमातून खूप वेळा वाचले, पण प्रत्यक्ष भेट दिली नव्हती. देशभरात अनेक ठिकाणी पोपटराव पवार यांची व्याख्याने एकली. आज प्रत्यक्ष हिवरेबाजार पहिल्यावर सारे काही पाहायला मिळाले. हिवरेबाजारचे काम हे राष्ट्रनिर्माणचे काम असून नव्या पिढीला यातून मोठी प्रेरणा मिळते.

अजिम प्रेमजी फाउंडेशनच्या माधमातून भारतभर आम्ही काम करतो. त्या कामालासुद्धा एक स्वावलंबी गाव कस करावं हे यातून प्रेरणा मिळते. सर्वांगी सुंदर हिवरेबाजारला आल्यानंतर प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून काम आता भारतभर जात आहे. त्याच्या मागे ही हिवरेबाजारची प्रेरणा आहे ही, आनंदाची गोष्ट आहे. हिवरे बाजार आता स्व:त साठी नाही तर पर्यवरण, पाणी, ग्रामविकास व कृषी भारतभर सर्व क्षेत्रात प्रेरणा स्थान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT