Irrigation Well Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Well : सोलारूर जिल्ह्यात गाव निहाय, १० शेततळी, १० विहिरी खोदणार

Drought Condition : जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात प्रत्येकाला ‘रोहयो’तून काम मिळावे, यासाठी शासनाने तातडीने आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात प्रत्येकाला ‘रोहयो’तून काम मिळावे, यासाठी शासनाने तातडीने आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार सात विभागांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना २५ प्रकारची कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थी निवडून किमान १० शेततळी आणि १० विहिरी पूर्ण करण्याचे उदिष्ठही ठरवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने सध्या रोजगार हमी योजनेचे तालुकानिहाय आराखडे तयार करण्याची कार्यवाही पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

जिल्ह्याचा आराखडा २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करून तो २० जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदेला पाठविणे अपेक्षित आहे. त्यानंतर कामांना प्रारंभ होणार आहे. दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी, कामाच्या शोधात नागरिकांना गाव सोडायला लागू नये, यासाठी ‘रोहयो’चा मोठा आधार आहे.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांमधून कामे केली जातील. केंद्र सरकारकडून ‘रोहयो’तून प्रत्येकाला १०० दिवस तर राज्य सरकारकडून २६५ दिवस काम दिले जाते.

त्याअंतर्गत दुष्काळी भागात कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचा सार्वजनित बांधकाम व लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा जलसंधारण विभाग, सामाजिक वनीकरण व जिल्हा वन विभागाच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

दुष्काळाच्या अनुषंगाने कामे करताना काही प्रमाणात निकषांत शिथिलता देण्याचे अधिकार पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश काढून १५ फेब्रुवारीपूर्वी सर्व कामांना मंजुरी देण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे.

दुष्काळी भागात ‘रोहयो’ तून होणार ‘ही’ कामे

दुष्काळी भागात शेततळे (प्रत्येक गावात १०) आणि त्याशिवाय कंपार्टमेंट बंडिंग, माती नालाबांध, गॅबियन स्ट्रक्चर, भूमिगत बंधारे, गांडूळखत निर्मिती, पाणंद रस्ते, शेत रस्ते, गाळ काढणे, अपूर्ण पाझर तलाव पूर्ण करणे, नाला सरळीकरण व खोलीकरण, सिंचन विहिरी, रोपवाटिका, वृक्ष लागवड अशी कामे होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT