Vighnahar Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Vighnahar Sugar Factory Elections: ‘विघ्नहर’च्या चार जागांसाठी निवडणूक; १७ जागा बिनविरोध!

Cooperative Elections: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या (शिरोली, जुन्नर) पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी शनिवार (ता. १५) मतदान होणार असून, रविवारी (ता. १६) मतमोजणी होईल.

गणेश कोरे

Pune News: सहकारी साखर कारखान्यांमध्ये देशभरात नावलौकिक मिळविलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या (शिरोली, ता. जुन्नर) पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी नंतर संचालकांच्या २१ पैकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर १७ जागा बिनविरोध झाल्या असून, चार जागांसाठी शनिवारी (ता. १५) मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील शिरोली बुद्रुक गटातील तीन जागांसाठी चार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शनिवारी (ता. १५) मतदान झाल्यानंतर रविवारी (ता. १६) मतमोजणी होणार आहे. शिरोली बुद्रूक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. या वेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी माघार घेतली असल्याचे प्रमोद खांडगे पाटील यांनी सांगितले.

- शिरोली बुद्रुक गटातील उमेदवार पुढीलप्रमाणे : रहेमान आब्बास मोमीन इनामदार, संतोष बबन खैरे, सुधीर महादू खोकराळे व विद्यमान अध्यक्ष सत्यशील सोपानशेठ शेरकर.

- इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातील उमेदवार : रहेमान आब्बास मोमीन इनामदार, सुरेश भीमाजी गडगे, नीलेश नामदेव भुजबळ.

- अन्य मतदार संघातील बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे : उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) : अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी, ओतूर गट (चार जागा) : धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर.

- पिंपळवंडी गट (तीन जागा) : विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव.

- घोडेगाव गट (तीन जागा) : यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात.

- अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : प्रकाश सरोगदेभटक्या-विमुक्त जाती- जमाती मतदार संघ (एक जागा) : संजय खेडकर.

- महिला राखीव ः नीलम तांबे, पल्लवी डोके.

विद्यमान संचालकांना पुन्हा संधी

विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांचेसह देवेंद्र खिलारी, संतोष खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी आहे.

हे नवे चेहरे झाले संचालक

माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संचालकपदाची संधी मिळाली आहे तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळेहे नवीन चेहरे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT