Lok Sabha Election Result 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Result 2024 : विदर्भात महायुतीला फटका; ‘इंडिया’ आघाडीची सरशी

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : विदर्भातील भाजपचे सर्वांत हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विजयाबाबत सुरुवातीला शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र त्यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत आपल्या विरोधकांना सणसणीत उत्तर दिले. दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मात्र पराभवाची चव चाखावी लागली. विदर्भातील बहुतांश जागांवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व राखले तर महायुतीला फटका बसला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विधान परिषदेची माजी आमदार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र विकास ठाकरे पहिल्या फेरीपासूनच पिछाडले. परिणामी गडकरी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. पंधराव्या फेरीअखेर नितीन गडकरी यांना ५,५९,१५७ तर विकास ठाकरे यांना ४,४०,१७४ मते मिळाली. १,१८,९८३ मतांची आघाडी गडकरी यांनी घेतली.

नामदेव किरसान यांच्या माध्यमातून काँग्रेसने गडचिरोलीत आयात केलेला उमेदवार दिला. केवळ याच मुद्द्यावर गडचिरोलीची निवडणूक भाजपकडून पुढे रेटण्यात आली. परंतु हा अपप्रचार भाजपसाठी पोषक ठरला नाही. भाजपचे अशोक नेते हे पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत पिछाडीवरच राहिले आणि डॉ. नामदेव किरसन यांना ३,२५,०५९ तर अशोक नेते यांना २,५९,६४९ मते होती. ६५,४२० मतांची आघाडी किरसन यांनी घेतली.

वर्धा मतदार संघात विद्यमान खासदार रामदास तडस हे हॅट्रिक करणार अशी शक्यता होती. परंतु त्यांच्या विजयाचा मेरू काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) आलेले अमर काळे यांनी रोखला. २५ व्या फेरीअखेर काळे यांनी ५३,७११ मतांची आघाडी घेतली होती. काळे यांना ४,०९,९६१ तर रामदास तडस यांना ३,५६,२५० मते मिळाली. अमरावती मतदार संघातील लढतीकडे सर्व राज्यास देशाचे लक्ष लागून होते.

युवा स्वाभिमानी या आपल्या आमदारपतीच्या पक्षाचा राजीनामा देत यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांचा थेट सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांच्याशी होता. १२ व्या फेरी अखेर वानखडे यांनी २६,९४७ मतांची आघाडी घेत अमरावती लोकसभा आपल्या नावावर केली. गोंदिया-भंडारा मतदार संघात सुनील मेंढे व काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत झाली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा गृह मतदार संघ. काँग्रेसने अटीतटीच्या लढतीत विजय अखेरीस खेचून आणला. बाराव्या फेरीअखेर १६,२८६ मतांचा लीड पडोळे यांना होता. चंद्रपूर मतदार संघात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. मुनगंटीवार यांना १,६१,८९२ तर धानोरकर यांना २,५९,६८१ अशी मते आठव्या फेरीअखेर होती. रामटेक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे व काँग्रेसचे श्याम बर्वे यांच्या थेट लढत झाली. परंतु पारवे यांना रामटेकचा गड राखता आला नाही.

शेतीप्रश्‍नांकडे दुर्लक्षाचा फटका

भाजप नेत्यांमध्ये वाढता अहंकार त्यासोबतच जातीय समीकरणे या वेळच्या निवडणुकीत प्रभावी ठरली. शेती प्रश्न मात्र दुर्लक्षितच राहिले. त्याचाही फटका भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना या निवडणुकीत बसला.

मतदार संघ : रामटेक

पक्ष उमेदवार पडलेली मते

काँग्रेस शाम बर्वे ३,३६,१३३

मतदार संघ : गडचिरोली

पक्ष उमेदवार पडलेली मते

काँग्रेस डॉ. नामदेव किरसन ३,२५,०५९

मतदार संघ : वर्धा

पक्ष उमेदवार पडलेली मते

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अमर काळे ४,०९,९६१

मतदार संघ : अमरावती

पक्ष उमेदवार मताधिक्य

काँग्रेस बळवंत वानखेडे २६,९४७

मतदार संघ : गोंदिया-भंडारा

पक्ष उमेदवार मताधिक्य

काँग्रेस प्रशांत पडोळे १६२८६

मतदार संघ : चंद्रपूर

पक्ष उमेदवार पडलेली मते

काँग्रेस प्रतिभा धानोरकर २,५९,६८१

मतदार संघ : नागपूर

पक्ष उमेदवार पडलेली मते

भाजप नितीन गडकरी ५,५९,१५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT