Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : विदर्भात आठवड्यापासून सूर्यदर्शनच नाही

Vidarbha Rain Update : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला असून, अनेक मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. त्यासोबतच प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्दमधून २ लाख ६ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत असून, ४० पैकी तब्बल १८ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १ जून ते २८ जुलै या कालावधीत पावसाची सरासरी ५९७.४ मिलिमीटर असताना आतापर्यंत ९७३ मिलिमीटर नोंदविण्यात आला आहे. सरासरीच्या १६२.९ टक्‍के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्या-नाल्यांना पूर आल्याने तब्बल १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामध्ये आलापल्ली-भामरागड, सिरोंचा-असरअल्ली जाफराबाद, अहेरी-देवलमारी-मोयाबिनपेठा, भामरागड-धोंडराज कवंडे, चातगाव-कारवाफा, बेजुरपल्ली परसेवाडा, झिंगानूर-कल्लेड-देचलीपेठा यासह इतर मार्गांचा समावेश आहे.

चातगाव मंडळात सर्वाधिक १८५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ येवली १६८, धानोरा १५, गडचिरोली १४६, मुरूमगाव १३९, पेंढरी १४० मिलिमीटर पाऊस पडला. गोसेखुर्दतून २ लाख ६ हजार क्‍युसेक एवढा विसर्ग वाढविण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात ३९९४१ शेतकऱ्यांचे १७ हजार ७२९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

प्राथमिक सर्व्हेक्षणांती ही आकडेवारी समोर आली असली तरी अंतिम अहवालांती हे नुकसान कमी होण्याची शक्‍यता आहे. तीन पशुधन, १६ गोठे, २८२ घरांचे अंशतः, तर ३३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी इशारा पातळी गाठली आहे. त्यामध्ये पुजारीटोलाचे ४ गेट उघडण्यात आले आहेत. संजय सरोवरामधून २००२३ क्‍युसेक, पुजारीटोला २८६०, धापेवाडा ९३,५४४ क्‍युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

यवतमाळमध्ये संततधार

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातील मसनी नदीवरील प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. परिणामी, अडाण नदीवर दारव्हा-यवतमाळ रस्ता बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा प्रकल्पाचे चार गेट २५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यातून २९६६ क्‍युसेक, तर गोकी १००९, वाघाडी १३१८, सायखेडा २४४९, लोअरपूस, बोरगाव २४, अडाण ३४९ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याच्या तीन मंडलांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली असून त्यामध्ये जोडमोहा, लोनबेहळ, अंजनखेडा या मंडळांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT