Vegetable Research Center Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Research Centre : एकार्जुना येथे होणार भाजीपाला संशोधन केंद्र

Sudhir Mungantiwar : ‘‘वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून आता नव्याने ऐकार्जुना येथे ३१ कोटी ९० लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे,’’ अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Team Agrowon

Chandrapur News : ‘‘वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून आता नव्याने ऐकार्जुना येथे ३१ कोटी ९० लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे,’’ अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म. रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, ‘‘चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबू शेती, वनशेती, रानभाजी शेती असे उपक्रम राबविण्यात येतील. जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ९० टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

एमआयडीसीच्या धर्तीवर आता एफआयडीसीची निर्मिती होईल. लाकडावर कोरीव काम करणाऱ्यांसाठी ४८ कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे.

मधाच्या दोन गावांची निवड

चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन मधासाठी प्रसिद्ध आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्त्वाचा भाग होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT