Dr. Sandeep Ingle Agrowon
ॲग्रो विशेष

VCI Election : ‘व्हीसीआय’च्या निवडणुकीत ‘आयव्हीए’ पॅनेलची बाजी

Election Update : पशू चिकित्सा सेवा, अभ्यासक्रमासह विविध बाबींचे नियमन करणाऱ्या भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या (व्हीसीआय) निवडणुकीत इंडियन व्हेटरनरी असोसिएशनच्या (आयव्हीए) पॅनेलने बाजी मारली आहे.

Team Agrowon

Nagpur News : पशू चिकित्सा सेवा, अभ्यासक्रमासह विविध बाबींचे नियमन करणाऱ्या भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या (व्हीसीआय) निवडणुकीत इंडियन व्हेटरनरी असोसिएशनच्या (आयव्हीए) पॅनेलने बाजी मारली आहे. या पॅनेलचे सर्व ११ सदस्य निवडून आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील डॉ. संदीप इंगळे यांचाही समावेश आहे.

पशुवैद्यक अभ्यासक्रमासह पशुचिकित्सा व इतर सेवांचे नियमन करण्याचे काम पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून होते. त्यामुळेच भारतीय पशुवैद्यक परिषदेला विशेष महत्त्व आहे. या परिषदेत तब्बल २७ सदस्यांची नेमणूक केली जाते. त्यातील ११ सदस्य हे पशुविज्ञान क्षेत्रातील देशभरातील तज्ज्ञांच्या माध्यमातून निवडले जातात.

अशा मतदारांची संख्या ६९ हजार इतकी आहे. पाच कुलगुरू, केंद्रीय संशोधन संस्थांवरील चार संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एक उपमहासंचालक, १ आयुक्‍त, भारत सरकारचे तीन माजी वरिष्ठ अधिकारी याप्रमाणे २७ जणांचा परिषदेवर समावेश राहतो.

दरम्यान, यावर्षी देशभरातून तब्बल ९२ व्यक्‍तींनी परिषद सदस्यासाठी निवडणूक लढविली. त्यामध्ये ‘आयव्हीए’ या पॅनेलच्या ११ सदस्यांचाही समावेश होता. यावर्षी ६९ हजार पैकी ३६ हजार मतदारांनी ऑनलाइन पद्धतीने मतदान केले. त्यामध्ये ‘आयव्हीए’च्या पॅनेलचे सर्व ११ सदस्य विजयी ठरले आहेत.

अमरावती येथील मुळचे असलेले डॉ. संदीप इंगळे हे ‘आयव्हीए’च्या पॅनेलद्वारे चौथ्यांदा परिषदेवर निवडून गेले आहेत. डॉ. इंगळे हे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे संचालक देखील आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये डॉ. उमेशचंद्र शर्मा, डॉ. इंद्रजित सिंग, डॉ. थंनीगावेल्लू डी., डॉ.दांडेश्‍वर डेका, डॉ. गुरुचरण दत्ता, डॉ. किरण वासवा, डॉ. सुशांथ राय बी., डॉ. गीता प्रिया एल., डॉ. विजय कुमार, डॉ. अमित नैन यांचा समावेश आहे.

इंडियन व्हेटरनरी असोसिएशनचे ११ सदस्यीय पॅनेल मोठ्या मताने निवडून आले आहे. येत्या काळात बदलत्या परिस्थितीनुसार पशुवैद्यक अभ्यासक्रमात बदलाबाबतची भूमिका परिषदेने घेतली आहे. त्या संदर्भाने काम सुरू आहे. इतरही अनेक सुधारणा पशुवैद्यक क्षेत्रात प्रस्तावित आहेत.
डॉ. संदीप इंगळे, भारतीय पशुवैद्यक परिषद, दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT