Vasantrao Naik
Vasantrao Naik Agrowon
ॲग्रो विशेष

वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे उद्या वितरण

टीम ॲग्रोवन

मुंबई : वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या स्मृतिशताब्दीनिमित्त कृषिदिनी (Agriculture Day) (ता. १ जुलै) विविध पुरस्कारांचे वितरण (Agriculture Award) करण्यात येणार आहे. दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक कृषी प्रक्रिया पुरस्कार मधाचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावास जाहीर झाला आहे. वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील सातमाने या गावास जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार खोज संस्था, अमरावतीच्या संस्थापिका पौर्णिमा उपाध्याय यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कारासाठी यंदा दै. ॲग्रोवनचे नाशिक प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांची निवड झाली आहे.

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी स्मरणिका प्रकाशनही करण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, कोषाध्यक्ष डॉ. बकुळ पटेल, माजी मंत्री मनोहर नाईक यांनी केले आहे.

व्यक्तिगत पुरस्कार याप्रमाणे :

१) वसंतराव नाईक कृषी पुरस्कार : डॉ. सुनील गोरंटीवार, राहुरी, जि. नगर

२) कृषी पत्रकारिता पुरस्कार : मुकुंद पिंगळे, ॲग्रोवन प्रतिनिधी, नाशिक

३) कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार : विजय देसाई, पावस, जि. रत्नागिरी

४) भाजीपाला उत्पादन पुरस्कार : शैलजा नरवडे, तुळजापूर, जि. उस्मानाबाद

५) फुलशेती पुरस्कार : सतीश मोहोळ, सचिन मोहोळ मावळ, जि. पुणे

६) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार : शरद शेळके, राहता, जि.नगर

७) जलसंधारण पुरस्कार : तुकाराम म्हात्रे, अंबरनाथ, जि. ठाणे

८) पर्यावरण पुरस्कार : जितीन साठे, पारनेर, जि. नगर

(वैयक्तिक पुरस्कारांचे ३५ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT