Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Equipment : वसई-विरार महापालिकेचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

Agriculture Inputs : एकीकडे महापालिकेत मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र समाविष्ट असल्यामुळे कृषीसंबंधी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

Team Agrowon

Palghar News : एकीकडे महापालिकेत मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र समाविष्ट असल्यामुळे कृषीसंबंधी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यांना अनुदानाचा लाभ मिळत नाही. वसई-विरार पालिका प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य आणि बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वसई-विरार महापालिकेत गावांचादेखील समावेश आहे. या गावांमध्ये आजही शेतजमिनी मोठ्या प्रमाणात असून, विविध पिकांची लागवड केली जाते. पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान, विविध साहित्य, तसेच अन्य फायदे मिळत होते, परंतु महापालिकेत समावेश झाल्यानंतर या लाभार्थ्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागते.

त्यामुळे पीक घेणाऱ्या अन्नदात्याला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. बदलते हवामान, अवकाळीचा परिणामदेखील शेतीवर होतो. महापालिकेने भरपाईसाठी प्रयत्न केले, तर त्याचा फायदादेखील स्थानिक शेतकऱ्यांना होऊ शकतो, अशी मागणी केली जात आहे. कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य, बी-बियाणे पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

कृषिमाल विक्री केंद्र प्रतीक्षेतच

वसई तालुक्यात कृषीमाल विक्री केंद्र अद्याप उभारले गेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडत्यावर अथवा ठाणे, मुंबईला जाऊन शेतमालाची विक्री करावी लागते. त्यामुळे वसईत कृषीमाल विक्री केंद्रासाठी मध्यंतरी हालचाली झाल्या, परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही.

वसई-विरार महापालिकेने शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे, मात्र पालिकेतील कृषी विभागाचे अधिकारी, तसेच शेतकऱ्यांना अत्याधुनिक बागायतीचे मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा असावी, जेणेकरून शहरातील शेतकऱ्यांना फायदा होईल.
- सुभाष भट्टे, प्रगतशील शेतकरी
मोठे बायागतदार कमी झाले आहेत, मात्र अल्पभूधारक आजही शेती करतो. शेतकरी राजासमोर अनेक संकटे येतात. परिणामी आर्थिक नुकसान आणि मेहनत वाया जाते. अशा शेतकऱ्यांसाठी महापालिकेने कृषीसंबंधी घेतलेला निर्णय चांगला आहे. तो अंमलात लवकर येईल, अशी अपेक्षा आहे.
- व्हेलेरियन लोपीस, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT