Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025: खरिपासाठी विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध

President Dnyaneshwar Ghodekar: आंबेगाव तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर घोडेकर यांनी केले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

मंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर घोडेकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित पुणे यांच्याकडील दर्जेदार इंद्रायणी, समृद्धी, भोगावती भात बियाणे आणि जे एस ३३५, फुले किमया केडीएस ७५३ व फुले किमया केडीएस ७२६ सोयाबीन बियाणे विक्रीसाठी संघाच्या डिंभे, घोडेगाव व मंचर डेपो येथे उपलब्ध झालेले आहे.

बियाणे साठा मर्यादित उपलब्ध असून सद्यःस्थितीत पाऊस समाधानकारक झालेला असला तरी देखील कृषी खात्याचा सल्ला घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा. संघामध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते व मिश्रखत खते विक्रीस उपलब्ध आहेत.

आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्याने खरेदी-विक्री संघाने नव्यानेच पशुखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांसाठी व दूध उत्पादन व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पशुखाद्य योग्य व वाजवी किमतीमध्ये खरेदी-विक्री संघाने विक्रीसाठी घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लोणी, धामणी, पारगाव व रांजणी येथे उपलब्ध केलेले आहे. खरीप हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त युरियासह, सर्व प्रकारची रासायनिक खते, बी बियाणे संघातून खरेदी करण्याचे आवाहन उपाध्यक्ष सोपानराव नवले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT