Sericulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : वर्धा होणार रेशीम शेतीचे हब

Vardha Silk Farming : रेशीम शेतीतून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिकस्थैर्य प्राप्त केले आहे. या शेतीला चालना मिळावी यासाठी केव्हीकेला तुती रोपवाटिका देत रेअरींग युनिट उभारले आहे.

Team Agrowon

Vardha : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेचे निमित्त ठरत असल्याने जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, ‘केव्हीके’मध्ये तुती रोपवाटिका, रेअरींग युनिट व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांच्या समस्यांचे निराकरण अशा बाबींवर भर देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

महात्मा गांधी, विनोबा भावेंसारख्या विभूतींमुळे राज्यात वर्धा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेती क्षेत्रातही या जिल्ह्याचे वेगळे अस्तित्व निर्माण व्हावे याकरिता प्रयत्न होत आहेत. त्याविषयी माहिती देताना श्री. कर्डीले म्हणाले, रेशीम शेतीतून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिकस्थैर्य प्राप्त केले आहे. या शेतीला चालना मिळावी यासाठी केव्हीकेला तुती रोपवाटिका देत रेअरींग युनिट उभारले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना मैसूर येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या साऱ्याच्या परिणामी रेशीम शेतीसाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये नागपूर विभागात वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. शेतकऱ्यांना सातत्याने रेशीम शेती विषयक मार्गदर्शन मिळावे याकरिता रेशीम विकास वर्धा, तुती लागवड गाइड असे २३-२४ व्हॉट्सअप तयार केले आहे. त्यावर शेतकरी कोश विक्री केल्यानंतर शेतकरी पावत्या टाकतात. त्यातून इतरांना प्रोत्साहन मिळते.

मनरेगा अनुदानाच्या अडचणीही याच ठिकाणी सोडविल्या जातात. रेशीम कोष उत्पादन वाढल्यास रेशीम बाजाराचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरही भर राहील. रेशीम सोबतच जिल्ह्याची ओळख असलेल्या वायगाव हळदीच्या लागवडीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला बाजारपेठ मिळावी याकरिता मुंबईत आयोजीत खरेदीदार विक्रेता संमेलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. त्याचाही बऱ्याच अंशी फायदा झाला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत विदर्भातील पहिले केव्हीके सेलसूरा (वर्धा) येथे आहे. मात्र नियोजन, इच्छाशक्‍ती अभावी याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेत तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती मिळावी याकरिता प्रशिक्षण हॉल, केव्हीके परिसराला कंपाऊंड, ॲग्री ड्रोन अशा सुविधांची उपलब्धता यातून करण्यात आली आहे. फवारणी कामी ड्रोनचे प्रात्यक्षिकासाठी ‘नाबार्ड’च्या माध्यमातून निधी उपलब्धतेवर भर राहील, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डील यांनी सांगितले. येत्या काळात ट्रायकोडर्मा लॅब करिता निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.
- राहुल कर्डील, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT