Rose Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Valentine Day: व्हॅलेंटाइन डे मार्केटला गुलाब दराची लाली खुलली

Rose Market Price: व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराई एकत्र आल्याने गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. वातावरण बदलाचा फटका बसल्याने उत्पादन काहीसे घटले असले, तरी गुलाबाच्या दरात वाढ झाली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : व्हॅलेंटाइन डे मार्केटसाठी लाल गुलाबांना विशेष मागणी असते. त्यातच यंदा लग्नसराई व व्हॅलेंटाइन डे एकत्र आल्याने मागणी वाढून फुलांची लाली खुलली. यंदा घाऊक बाजारात दांडीच्या गुलाबाला १२ ते १८ रुपये दर मिळाल्याने गुलाब फूल उत्पादक शेतकरी व फुलविक्रेत्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी बाजारात उत्साह दिसून आला.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या अंगाने नियोजन केले. मात्र वातावरण बदलाचा फटका बसला. अनेक ठिकाणी डाऊनी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम दिसून आला. त्यामुळे मागणीच्या तुलनेत यंदा आवक कमी असल्याने गुलाबाचे दर यंदा टिकून राहिल्याचे दिसून आले.

टॉप सिक्रेट, बोर्डेक्स वाणांच्या गुलाबांना मागणी

लाल रंग, लांब दांडी यांसह हिरवी पाने अशा आकर्षक फुलांना मागणी असते. बाजारपेठेत ‘टॉप सिक्रेट’ व ‘बोर्डेक्स’ या वाणांच्या दांडीसहित गुलाबाची मागणी वाढली. मात्र तुलनेत ‘टॉप सिक्रेट’ला अधिक दर मिळाले. जिल्ह्यात प्रामुख्याने तपोवन, मखमलाबाद, आडगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, जानोरी, आंबे व शिवनई परिसरांत मोठ्या प्रमाणावर पॉलिहाउसमध्ये उत्पादित फुलांचा पुरवठा स्थानिक नाशिक बाजारसह मुंबई, नागपूर, दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे करण्यात आला. यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’साठी चांगली मागणी दिसून आली. प्रतिफूल सरासरी १२ ते १५ रुपये दरम्यान विकले गेले.

गेल्या तीन वर्षांतील गुलाब दराची स्थिती : (दर रुपये)

वर्ष..किमान...कमाल...सरासरी

२०२३...७...१३...१०

२०२४...१०...१८...१२

२०२५...१२...२०...१५

यंदा उत्पादनाच्या अंगाने नियोजन केले; मात्र वातावरण बदलाचा फटका बसला. सरासरीच्या तुलनेत यंदा उत्पादन काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. त्यातच लग्नसराई व व्हॅलेंटाइन डे एकत्र आल्याने गुलाबाला मागणी होती. यंदा दर चांगले मिळाले असले तरीही उत्पादन कमी असल्याने बरोबरी झाली आहे.
सचिन जेजुरकर, गुलाब उत्पादक, तपोवन शिवार, नाशिक
मागील वर्षीपेक्षा यंदा उत्पादन तुलनेत कमी होते. मात्र मागील वर्षी उत्पादन चांगले होते तर यंदा तुलनेत दर वाढले. फुलांची मागणी वाढत असल्याने यंदा बाजारात उत्साह दिसून आला.
जालिंदर गोवर्धने, गुलाब उत्पादक शेतकरी, मोहाडी, ता. दिंडोरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT